मुख्य संपादक :-कुलदिप सुरोशे
पुसद.जिल्हा निबंधक (सावकारी) यवतमाळ यांचे आदेशान्वये सावकारी झडती पथकाने आज दिनांक ०४.०४.२०२५ रोजी महाराष्ट्र सावकारी (नियमन) अधिनियम २०१४ चे कलम १६ अन्वये गैरअर्जदार अनिल मधुकर गडम रा. मामा चौक, पुसद यांचे राहते घर व सुभाष चौक पुसद येथील किराणा दुकानाची अवैध सावकारीचे अनुषंगाने झडती घेतली आहे. सदर झडती दरम्यान घर व दुकानातुन अवैध सावकारी संबधाने कागदपत्रे / दस्तऐवज / धनादेश / डायरी जप्त करण्यात आले आहे.

अर्जदार श्री. वैभव गोधाजी बोरकुट रा.लोणी ता. पुसद जि. यवतमाळ यांनी दिनांक १७.०३.२०२५ रोजी सावकाराचे जिल्हा निबंधक यवतमाळ यांच्याकडे तक्रार अर्ज दाखल केला होता. त्यामध्ये गैरअर्जदार हे बेकायदेशीर सावकारी करीत असुन अवैध सावकारीच्या व्यवहारात शेत जमिनीचे खरेदीखत लिहुन घेतले असुन ते रद्द करुन मिळणे व गैरअर्जदाराविरुध्द फौजदारी कारवाई करण्याकरीता विनंती करण्यात आलेली आहे.सदर तक्रारीचे अनुषंगाने पडताळणी करण्याकरीता झडती पथकाने आज दि.०४.०४.२०२५ रोजी गैरअर्जदार अनिल मधुकर गडम यांच्या घर व किराणा दुकानाची झडती घेतली असुन झडती दरम्यान कोरे बाँड, कोरे चेक, खरेदीखत, नोंदी असलेल्या डायऱ्या, चिठ्या असे एकुण ५८ कागदपत्रे / दस्त जप्त करण्यात आले आहेत.


सदर कागदपत्रे व दस्तांची पडताळणी करुन महाराष्ट्र सावकारी (नियमन) अधिनियम २०१४ मधील तरतुदीनुसार कार्यवाही प्रस्तावीत करण्यात येणार आहे.सदर कारवाई सावकाराचे जिल्हा निबंधक तथा जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था यवतमाळ श्री. नानासाहेब चव्हाण यांचे नेतृत्वामध्ये दोन पथके निर्माण करण्यात आली होती. श्री. केशव मस्के, सावकाराचे सहाय्यक निबंधक दिग्रस व श्री. सुनिल भालेराव, सावकाराचे सहाय्यक निबंधक पुसद यांची पथक प्रमुख म्हणुन काम पाहीले.
सदर दोन पथकामध्ये अनिल सुरपाम, सहकार अधिकारी पुसद, संजय पिंपरखेडे, सहकार अधिकारी उमरखेड, जि.पी.राठोड सहकार अधिकारी श्रेणी-१ दारव्हा, श्रीमती सविता चांदेकर, सहकार अधिकारी कळंब, चेतन राठोड सहकार अधिकारी श्रेणी-१ महागांव, अमोल काळमोरे सहाय्यक सहकार अधिकारी पुसद, राजेश नाईक, सहाय्यक सहकार अधिकारी दारव्हा, श्रीमती इरावती चव्हाण, लिपीक लेखापरिक्षक पुसद, तसेच पोलिस अधिकारी व कर्मचारी श्री. प्रविण वेरुळकर, सहाय्यक पोलिस निरीक्षक पो.स्टे. वसंतनगर, संतोष चव्हाण, जमादार, विमल डवरे, महीला पोलिस शिपाई, अविनाश बळिराम राठोड जमादार, किरण राठोड म.पो.शि. गोपाल जाधव व सुजाता नरवाडे होमगार्ड, कॅमेरामन गजानन सुरोशे व समिर करे व पंच म्हणुन श्री. सुनिल जाधव ग्राम महसुल अधिकारी, ज्ञानेश्वर रेणके महसुल सेवक, इंदल चव्हाण, ग्राम महसुल अधिकारी, रोहण बिडकर, महसुल सेवक इत्यादी कर्मचारी सदर कार्यवाही मध्ये सहभागी होते.सदर संपुर्ण कारवाई मा. जिल्हाधिकारी यवतमाळ तथा अध्यक्ष, जिल्हा सनियंत्रण समिती, मा. पोलिस अधिक्षक यवतमाळ आणि जिल्हा उपनिबंधक नानासाहेब चव्हाण यांचे मागदर्शनात सहकार विभाग, महसुल व पोलिस प्रशासनातील अधिकारी कर्मचारी यांनी पार पाडली.

#युवासंघर्ष- डिजिटल मीडिया

