मुख्य संपादक:-कुलदिप सुरोशे
पुसद : स्थानिक गुन्हे शाखा पथकाला गोपनिय माहिती मिळाली की इसम नामे नितिन मनोहर आडे वय 36 वर्ष राहणार गायमुख नगर पुसद हे माहुर नाका येथे टपरीच्या पाठीमागे मोटार सायकलवर देशी दारूची वाहतूक करित आहे गोपनिय माहिती मिळाल्याने मौजे विठाळा येथे नाकारोडवर दोन पंचा समक्ष सापळा रचून कारवाई केली.
इसम नामे नितिन मनोहर आडे च्या ताब्यातून देशी दारू टँगो 90 एम एल क्षमतेच्या एकूण 68 शिश्या प्रत्येकी किंमत 35 रुपये प्रमाणे 2380 देशी दारू बॉबी संत्रा 90 एम एल क्षमतेच्या एकूण 130 शिश्या प्रत्येकी किंमत 35 रुपये प्रमाणे 4550 रुपये दारू विक्री करून आलेली रोख रक्कम 4380 रुपये एक सिल्वर रंगाचा रियल मी कंपनीचा मोबाईल किंमत 10000 रुपये एक काळ्या रंगाची मोटार सायकल क्रंमाक MH 29 AV 6790 किंमत 80000 असा एकूण 101310 रुपयेचा मुद्देमाल जप्त करून ताब्यात घेतला सदरचा माला पैकी 90 एम एल शिशी नमुन्या करिता राखून ठेवून उर्वरित माल व मोटार सायकल पोलीस स्टेशन मध्ये जमा केली.
आरोपी विरुद्ध अपराध क्रंमाक 2025 कलम 65 (E) महाराष्ट्र दारूबंदी कायदा प्रमाणे गुन्हा नोंद केला आहे.सदरची कारवाई पुसद उमरखेड LCB पथकाने पार पाडली.
#युवासंघर्ष-डिजिटल मीडिया

