मुख्य संपादक:-कुलदिप सुरोशे
पुसद.आज दिनांक 24 एप्रिल दुपारी 2 वाजताच्या दरम्यान पुसद शेंबाळपिंपरी मार्गावर आमदरी गावाजवळ घाटात मोटारसायकल आणि इंडिका गाडीचा भीषण अपघात झाला आहे, या अपघातात मिलिंद वाहूळे रा,शेंबाळपिंप्री, नितीन जमदाडे व उमेश जमदाडे रा. उचेंगाव हे तीन तरुण गंभीरपणे जखमी झाले.

जखमी झालेल्या युवकांना तात्काळ पुसद येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले होते, पण रुग्णालयात दाखल होण्यापूर्वी गंभीरपणे जखमी झालेल्या उमेश याचा दुर्दैवाने मृत्यू झाला,हा अपघात इतका भयंकर होता की,गंभीर जखमी उमेश याचा एक पाय तुटून चक्क दूर जंगलात पडला,त्यामुळे त्याच्या शरीरातुन मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाला असल्याने दवाखान्यात दाखल करण्यापूर्वी त्याचा मृत्यू झाला.

तर गंभीर जखमी असलेल्या इतर दोघांना शासकीय रुग्णालयातुन पुढील उपचारासाठी मेडिकेअर हॉस्पिटल मध्ये हलविण्यात आले आहे, पुसद-पिंप्री रोडवर अपघाताची मालिका चालूच असून मागील तीन महिन्यातील हा पंधरावा अपघात असल्याची माहिती नागरिकांनी दिली आहे.

अनेक तरुण बेभान होऊन सुसाट वेगाने गाड्या चालवत आहेत पण वाहतूक पोलीस याकडे दुर्लक्ष करत असल्याची बाब नागरिक बोलून दाखवत आहे. हे विशेष..!


#युवा संघर्ष-डिजिटल मीडिया
