मुख्य संपादक:-कुलदिप सुरोशे
पुसद.येथे आज दिनांक 15 फेब्रुवारी 2025 रोजी जगद्गुरु संत श्री सेवालाल महाराज यांच्या जयंतीनिमित्त पुसद येथे भव्य शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले. यावेळी सर्वप्रथम स्व. वसंतराव नाईक चौक येथे संत सेवालाल महाराज व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून पूजन करण्यात आले, त्यानंतर वसंतराव नाईक चौक येथून डीजे व डफड्याच्या तालावर या शोभा यात्रेला सुरुवात झाली. या शोभा यात्रेमध्ये सहभागी महिला व समस्त गोरबंजारा बांधवांनी डीजे व डफडीच्या तालावर नृत्य करीत उत्साह साजरा केला.

हि शोभायात्रा स्व. वसंतराव नाईक चौकामधून शनी मंदिर चौक,महात्मा ज्योतिबा फुले चौक,बस स्टॅन्ड चौक, छत्रपती शिवाजी महाराज चौक,नेताजी सुभाष चंद्र बोस चौक, मुखरे चौक या मार्गाने जाऊन पुन्हा स्व. वसंतराव नाईक चौक येथे या शोभा यात्रेची सांगता करण्यात आली. या शोभायात्रेत महिला पुरुष लहान मुले व मुली तसेच समस्त गोर बंजारा समाज बांधव हजारोच्या संख्येने सहभागी झाले होते.



