मुख्य संपादक:-कुलदिप सुरोशे
पुसद — छत्रपती शिवराय जन्मोत्सव समिती पुसद च्या वतीने आयोजित शिवपर्व 2025 मध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांचे विचार शाळेतील प्रत्येक विद्यार्थ्यापर्यंत पोहोचले पाहिजे व त्यामधून समाजाला विशिष्ट प्रकारचा संदेश मिळाला पाहिजे या उद्देशाने दिनांक 16 फेब्रुवारी 2025 रोजी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवन कार्यावर प्रकाश टाकणारी शिव शौर्यगाथा स्पर्धा आयोजित करण्यात आली होती .या स्पर्धेत पुष्पावंती परिसरातील तब्बल 11 शाळांनी सहभाग घेतला त्यामधून श्री शिवाजी शिक्षण संस्था पुसद द्वारा संचालित गुरुकुल इंग्लिश स्कूल पुसद यांना प्रथम क्रमांकाने सन्मानित करण्यात आले. छत्रपती शिवराय जन्मोत्सव समितीचे मुख्य संयोजक शरद मैंद, श्री शिवाजी शिक्षण संस्था पुसद चे अध्यक्ष अनिरुद्ध पाटील चोंढीकर ,डॉ. अमोल मालपाणी, विजय जाधव, महेश भाऊ खडसे, अँड . भारत जाधव, क्रांती पाटील कामारकर यांच्या हस्ते रोख पारितोषिक 7000/- रुपये सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला. याप्रसंगी श्री शिवाजी शिक्षण संस्थेच्या सचिव अश्विनीताई पाटील चोंढीकर व गुरुकुलचे प्राचार्य नामदेवराव फाटे उपस्थित होते.

शिवकालीन परिस्थिती आणि आजची वर्तमान परिस्थिती याची सांगड घालणारी महाराजांची न्याय सदर ही लघु नाटिका सादर करण्यात आली या नाटिकेत 27 विद्यार्थी सहभागी असून यशस्वीतेसाठी प्राची गायकवाड, स्वाती पाटील ,स्वाती सुरोशे,सुरज चौधरी या प्रभारी शिक्षकांनी पुढाकार घेतला.

