मुख्य संपादक – कुलदिप सुरोशे
पुसद.वीर शिरोमणी महाराणा प्रतापसिहं यांचा जन्मोत्सव दि. 9 मे रोजी शहरामध्ये अखिल भारतीय क्षत्रिय महासभा यवतमाळ जिल्हा व राजपूत चेतना मंच पुसद यांच्या संयुक्त विद्यमाने वीर शिरोमणी महाराणा प्रतापसिंह यांची 485 वी जयंती मोठ्या उत्साहात व हर्ष उल्लासात साजरी करण्यात आली. याप्रसंगी दिलीप सिंह हजारी अध्यक्ष राजपूत समाज महाराष्ट्र यांच्या अध्यक्षतेखाली हॉटेल अनुप्रभा येथे सायंकाळी सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न झाला.
तर सकाळी कै. नाईक चौक येथे वीर शिरोमणी महाराणा प्रताप सिंह यांच्या प्रतिमेचे पूजन करून भव्य मोटर सायकल रॅली शुभारंभ करण्यात आला. सदर मोटरसायकल रॅली चे नियोजन दीपक सिंह परिहार, संजय चव्हाण, धर्मेंद्र ठाकूर, दिनेश ठाकूर, अमरदीप राठोड यांच्या मार्गदर्शनात सदर भव्य मोटर सायकल रॅली निघाली. बिरसा मुंडा चौक, महात्मा ज्योतिबा फुले चौक, छत्रपती शिवाजी महाराज चौक, नेताजी सुभाष चंद्र बोस चौक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, मुखरे चौक अशी मार्गस्थ होत नाईक चौक येथे सदर मोटरसायकल रॅलीचा समारोप करण्यात आला.

तर सायंकाळी आयोजित सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये दिलीप सिंह हजारी, लखन सिंह ठाकूर, श्याम सिंह ठाकुर, श्रीमती सुषमा ठाकूर, श्रीमती पूजा दीदी बिसेन, धरम सिंह ठाकुर, राजेंद्र सिंह परिहार, नारायणसिंह ठाकूर, मेजर प्रताप सिंह ठाकुर, राजेंद्रसिंह चव्हाण, इत्यादी पदाधिकारी व्यासपीठावर उपस्थित होते. प्रास्ताविक दारासिंह राणा यांनी केले.
प्रा. नारायणसिंह वर्मा यांनी वीर शिरोमणी महाराणा प्रताप यांच्या जीवन चरित्रावर प्रकाश टाकला . तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रद्धा ताई सुरोशे, तर आभार दारासिंह कछवा यांनी मानले. या प्रसंगी छोट्या मुलांची भाषणे, नृत्य, राजपूत महिलांचा ग्रुप डान्स, संपन्न झाला. यावेळी दारासिंह ठाकूर यांचा दिलीप सिंह हजारी यांच्या हस्ते शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.

तसेच सुरेंद्रसिंह राठोड यांचा Rtf नांदेड व करणी सेने तर्फे सत्कार करण्यात आला. यावेळी सुरेंद्र सिंह राठोड, सुरेश सिंह चव्हाण, मनोज ठाकूर, दारासिंह राणा, सौ मनीषा अमरदीप सिंह राठोड, गिरजादेवी सेंगर , रीता देवी बघेल, सौ रेखा संजय चव्हाण, ओम प्रकाश सिंह आर्य, कमलेश गहरवार, भारती गौतम, डॉ. सपना गौतम, सौ माधुरी वर्मा, सौ भावना गौतम सोनी ठाकूर, संजय बयास, डॉ. भोला सिंह सूर्यवंशी, डॉक्टर संजय सिंह गौतम, डॉ. दुर्गेसिंह गौतम, विजयसिंह सेंगर, अनिल सिंह बयास, सोहम सिंह पवार, जितेंद्र सिहं दीक्षित , रोहित दीक्षित, शक्ती ठाकुर यांच्यासह मोठ्या संख्येने समाज बांधव उपस्थित होते.
#युवासंघर्ष-डिजिटल मीडिया

