मुख्य संपादक:-कुलदिप सुरोशे
पुसद.आज दिनांक 25 मार्च रोजी सकाळी 11 ते 11.30 वाजताचे दरम्यान पुसद उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालयातील आरसीपी पथकाने प्रतिबंधित गुटख्यावर मोठी कारवाइ करत एकूण 47290 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

यात प्राप्त माहितीनुसार काळी दौलत कडे एक मोटार सायकल क्रमांक MP-28-M- 7904 वर प्रतिबंधित गुटखा विक्री साठी घेऊन जात असल्याची मुखबीर मार्फत माहिती वरून ११ ते ११/३० च्या दरम्यान त्याचा पाठलाग करून त्यास हीवरी फाटा येथे थांबून चौकशी केली असता सदर चां ऐकून 47290 रुपये माल मिळून आला.
यावरून आरोपी सैय्यद फैजान सैय्यद गणी वय 24 वर्षे रा काळी दौ. याला अटक करण्यात आली आहे.
सदर कार्यवाही मां.पोलिस अधीक्षक श्री. कुमार चिंता साहेब अप्पर पोलिस अधीक्षक श्री पियूष जगताप साहेब तसेच सहा.पोलिस अधीक्षक तथा उपविभागीय पोलिस अधिकारी श्री हर्षवर्धन बी जे साहेब यांचे मार्गदर्शनाखाली जमा.अभिजीत सांगळे गजानन चव्हाण पो.शी.पराग गिर्णाले सौरभ लोखंडे यांनी पार पाडली.
#युवासंघर्ष-डिजिटल मीडिया

