मुख्य संपादक :-कुलदिप सुरोशे
पुसद :- आज दिनांक 13 फेब्रुवारी 2025 रोजी एका तरुणाने सोशल मीडियावर छत्रपती शिवाजी महाराज व संत सेवालाल महाराज यांच्याबद्दल आक्षेपार्ह कमेंट केल्याने पुसद शहरात काही काळ तणावाची परिस्थिती निर्माण झाल्याने सर्वत्र एकच खळबळ उडाली होती. यात प्राप्त माहितीनुसार आज दिनांक 13 फेब्रुवारी 2025 रोजी दुपारी 2 ते 3 वाजताचे दरम्यान एका तरुणाने इंस्टाग्राम या सोशल मीडियावर छत्रपती शिवाजी महाराज व संत सेवालाल महाराज यांच्या बद्दल आक्षेपार्ह कमेंट केली. यानंतर शहरात तणावाची स्थिती निर्माण झाली होती.

यावर पोलीस प्रशासन त्वरित ऍकशन मोडवर येऊन आरोपीचा शोध घेणे सुरु झाले व सदर आरोपी हा शहरातील एका महाविद्यालयात असल्याचे माहितीवरून पोलिसांनी सदर महाविद्यालयात जाऊन आरोपीला ताब्यात घेतले. यानंतर समाज बांधवानी पोलीस स्टेशन पुसद शहर येथे जाऊन या आरोपी विरुद्ध तक्रार दिली व त्यानंतर यातील काही समाज बांधवानी शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे रस्तारोको करण्याचा प्रयत्न केला परंतु त्यानंतर पोलीस प्रशासनाने सदर समाजबंधवाना समजवून त्यांना परत पाठविण्यात आले. तसेच पोलीस प्रशासनाकडून सर्व नागरिकांना शांततेचे आवाहन करण्यात आले आणि नागरिकांनी कोणत्याही अफवावर विश्वास ठेवू नये असे आवाहन सुद्धा करण्यात आले आहे.

आता आगामी काळात छत्रपती शिवाजी महाराज व संत सेवालाल महाराज यांची जयंती आहे व जयंती निमित्त संपूर्ण शहरात जय्यत तयारी सुरु आहे व अशा सोशल मीडियावर आक्षेपार्ह कमेंट मुळे शहरातील वातावरण बिघडविण्याचे काम सुरु आहे का अशा प्रश्न उपस्थित झाला आहे.

