मुख्य संपादक:-कुलदिप सुरोशे
पुसद.आज दिनांक 23मार्च रोजी 9 ते 10 वाजता दरम्यान RCP पथकाला गोपनीय माहिती मिळाली की वीणा नंबर चे ट्रॅक्टर हे आपले वाहनात वीणा परवाना अवैद्य रेती बोरणगर येथे घेऊन जात आहे,अश्या माहिती वरून मां.पोलिस अधीक्षक सा. अप्पर पोलिस अधीक्षक यवतमाळ तसेच सहायक पोलिस अधीक्षक तथा उपविभागीय पोलिस अधिकारी हर्षवर्धन बी जे यांचे मार्गदर्शन खाली जमादार अभिजीत सांगळे पो.शी. नरेश नरवाडे सौरभ लोखंडे मुरली पांदुले असे मिळून बोरनगर रोड ने जात असताना सदर ट्रॅक्टर आढळून आला.
RCP पथकाने ट्रॅक्टर चालकास थांबवून चालक यांचे कडे चौकशी केली असता सदर ट्रॅक्टर हे साहेबराव रत्ना राठोड रा.बोरनगर यांच्या मालकीचे असल्याचे सांगितले आहे.
या वरून सदर ट्रॅक्टर व रेती 1 ब्रास असा मिळून 150000 (दीड लाख) रुपया चां माल जप्त करून तहसील विभागाचे नायब तहसीलदार श्री गणेश कदम साहेब व त्यांचे सहकारी यांचे ताब्यात देण्यात आले.
#युवासंघर्ष-डिजिटल मीडिया

