मुख्य संपादक:-कुलदिप सुरोशे
पुसद.नगर परिषद उर्दू प्राथमिक शाळा क्रं. 3 या शाळेमध्ये अनेक विद्यार्थी शिक्षण घेत असून या शाळेची ईमारत फार जुनी सन 1967 ची असून ही ईमारत पूर्णतः जीर्ण झालेली आहे.

सदर इमारतीच्या छताला जागोजागी तडे गेलेले आहेत,त्यामुळे सदरची ईमारत हि कधीही कोसळू शकते. तसेच शाळेची ईमारत रोडच्या 2 फुट खाली असल्यामुळे पावसाळयामध्ये रोड व नाल्याचे पाणी शाळेमध्ये घुसते. त्यामुळे विद्याथ्यर्थ्यांना बसण्यासाठी जागा राहत नाही. त्यावेळेस विद्यार्थ्यांना खूप नाहक त्रास सहन करावा लागतो.

तसेच शाळेला सुरक्षा भिंत ही खुप लहान असल्याने बाहेरील टवाळखोर मुले येवून शाळेचे नुकसान करीत आहेत. व विद्यार्थ्यांच्या जिवीत्वास कधीही धोका होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे एखादी मोठी दुर्घटना घडून काही अनुचित प्रकारही घडू शकतो . याकरीता जिर्ण झालेली शाळेची ईमारत त्वरित पाडून नविन शाळेची ईमारत बांधण्याबाबत संबंधीत नगरपरिषद मुख्याधिकारी अभिजीत वायकोस व राज्यमंत्री मा.श्री. इंद्रनिल नाईक यांना सर्व पालकांनी निवेदनाद्वारे कळविले आहे.

जीर्ण झालेल्या सदर इमारतीकडे राज्यमंत्री श्री.इंद्रनील नाईक हे किती तातडीने लक्ष देतील याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. हे विशेष..! #युवासंघर्ष– डिजिटल मीडिया

