मुख्य संपादक:-कुलदिप सुरोशे
पुसद.एक 20 वर्षीय तरुण पुसद शहरात देशी बनावटीचे पिस्तूल सोबत बाळगून काहीतरी अनुचित घटना घडविण्याच्या उद्देशाने पुसद शहरात फिरत असल्याची गोपनीय माहिती वसंत नगर पोलीस स्टेशन येथील पोलीस पथकाला मिळाली. या माहितीच्या आधारे पोलिसांमार्फत त्या ठिकाणी जाऊन सदर वीस वर्षीय तरुणास ताब्यात घेऊन त्याची अंग झडती घेतली असता , त्याच्याजवळ एक देशी बनावटीची पिस्तूल व दोन जिवंत काडतूस आढळून आले . सविस्तर वृत्त असे की वसंत नगर पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक योगेश जाधव व त्यांचे टीमला दि. 2 मार्च 2025 रोजी पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या वाशिम रोड प्रभा पेट्रोल पंप समोर एक तरुण देशी बनावटीची पिस्तूल सोबत बाळगून आहे अशी गुप्त माहिती मिळाली. या माहितीच्या आधारे सदर पथक त्या ठिकाणी जाऊन सदर तरुणास ताब्यात घेऊन त्याचे नाव गाव विचारले असता , त्याने त्याचे नाव देव दिलीप श्रीरामे वय 20 वर्ष रा. छत्रपती शिवाजी महाराज वार्ड पुसद असे सांगितले. पोलिसांमार्फत त्याची अंग झडती घेतली असता , त्याच्याजवळ एक देशी बनावटीची पिस्तूल व दोन जिवंत काडतूस मिळून आले. सामाजिक शांतता व सुव्यवस्था भंग करण्याचे उद्देशाने तसेच काही घातपात करण्याचे उद्देशाने स्वतःजवळ देशी बनावटीची पिस्तूल बाळगणाऱ्या वीस वर्षे देव दिलीप श्रीरामे याचे विरुद्ध वसंत नगर पोलीस स्टेशन येथे भारतीय शस्त्र अधिनियम कलम 3 , 25 अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे.सदरची कारवाई कुमार चिंता पोलीस अधीक्षक यवतमाळ , पियुष जगताप अप्पर पोलीस अधीक्षक यवतमाळ , हर्षवर्धन बीजे उपविभागीय पोलीस अधिकारी पुसद , यांच्या मार्गदर्शनाखाली सतीश जाधव पोलीस निरीक्षक पोलीस स्टेशन वसंत नगर , पोलीस उपनिरीक्षक योगेश जाधव , हेड कॉन्स्टेबल अशोक चव्हाण , मुन्ना आडे , सतीश शिंदे व संजय पवार यांनी केली आहे.#युवासंघर्ष-डिजिटल मीडिया

