जिल्हा मध्यवर्ती बँकेत २० दिवस चालणार तपासणी.
मुख्य संपादक :-कुलदिप सुरोशे
पुसद.शेतकऱ्यांची बँक अशी ओळख असलेल्या यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचा कारभार सध्या चांगलाच चर्चेत आहे. विविध शाखांमधील घोटाळे, अपहार गाजत असतानाच नाबार्ड जिल्हा बँकेचे स्पेशल ऑडिट करणार आहे.
तपासणीच्या पार्श्वभूमीवर पथक आज दि. 03 मार्च रोजी सोमवारी जिल्ह्यात धडकणार आहे. नाबार्ड २० दिवस व्यवहारांची तपासणी करणार असून,नाबार्डची ही वार्षिक विशेष तपासणी नियमित असली तरी यंदाच्या ऑडिटला मोठे महत्त्व प्राप्त झाले आहे. तसेच नाबार्डकडून विशेष तपासणीनंतर सादर केला जाणारा अहवाल बँकेची एकूण स्थिती दर्शविणारा असतो.
बऱ्याच दिवसापासून जिल्हा बँकेचा कारभार नियंत्रणाबाहेर चालल्याचे चित्र दिसत आहे.संचालक मंडळातील मतभेदही अनेकदा चव्हाट्यावर आले.अध्यक्ष मनीष पाटील यांच्याविरोधात अविश्वास प्रस्तावाची खेळी खेळल्या गेली होती. परंतु हा अविश्वास प्रस्ताव मंजूर झाला नसला तरी जिल्हा बँकेत सर्व काही आलबेल नाही हे मात्र स्पष्ट झाले.

नुकतीच जिल्हा बँकेत संचालक मंडळाची बैठक पार पडली.या बैठकीत गतवेळी घेण्यात आलेले निर्णय रद्द करण्यात आले. नोकर भरतीसाठी नेमण्यात आलेल्या उपसमितीनंतर अधिकाराची चर्चा चांगलीच रंगली आहे.
जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या अंदाजे ९५ च्या जवळपास शाखा आहेत. आतापर्यंत पाच ते सहा शाखांमधील घोळ समोर आला. हे विशेष..!
चौकट:-नाबार्ड काय तपासणार?
1-आजवर झालेल्या कारभाराची प्रकरणे पाहता आणि जांब बाजार शाखेतील घोळ लक्षात घेऊन नाबार्डने सर्वच शाखांची विशेष तपासणी करावी, अशी मागणी खातेदार शेतकरी करीत आहे.
2-नाबार्ड कर्ज वाटप, कर्ज वसुली, दैनंदिन व्यवहार, गुंतवणूक आणि वार्षिक खरेदी प्रक्रिया याची तपासणी करणार आहे
3-शिवाय पुसद तालुक्यातील जांब बाजार शाखेतील पाच कोटींचा अपहारही सध्या डंक्यावर आहे. य्रकरणात अहवाल येताच गुन्हे नोंदविले जाणार आहेत . यापूर्वी महागाव, हिवरा संगम, आर्णी, दिग्रस या शोखतील अपहार समोर आले. काही प्रकरणात गुन्हे दाखल होऊन निलंबनाची कारवाई झाली.
4-दरम्यान आता नाबार्ड सोमवार पासून तपासणी सुरू करणार आहे. मात्र नाबार्ड कोणत्या शाखेला भेट देऊन तपासणी करेल, याचा नेम नाही.#युवासंघर्ष-डिजिटल मीडिया

