मुख्य संपादक:-कुलदिप सुरोशे
पुसद.दिनांक: 28 फेब्रुवारी 2025 थोर शास्त्रज्ञ सी. व्ही. रमण यांच्या सन्मानार्थ आज 28 फेब्रुवारी रोजी स्थानिक श्री शिवाजी विद्यालय पुसद येथे राष्ट्रीय विज्ञान दिनाचे आयोजन करण्यात आले . यानिमित्त वैज्ञानिक प्रतिकृती प्रदर्शनी वैज्ञानिक तक्ते निर्मिती स्पर्धा व विज्ञान प्रश्नमंजुषा इत्यादी उपक्रम घेण्यात आले .

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य , श्री रामचंद्र हिरवे सर हे होते , तर प्रमुख अतिथी म्हणून श्री गजानन जाधव , श्री परसराम वसावे व श्री आतिश पत्रे यांची उपस्थिती लाभली.
सी. व्ही. रमण यांच्या प्रतिमेचे पूजन माल्यार्पण व दीप प्रज्वलन करून मान्यवरांच्या हस्ते कार्यक्रमाचे रीतसर उद्घाटन केरण्यात आले. मान्यवरांच्या स्वागतानंतर विज्ञान शिक्षिका सौ सारिका जाधव यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक सादर केले . श्री मंगेश जाधव सर यांनी विद्यार्थी जिज्ञासा उद्यीप्त करणारी व ते किती अद्यावत आहेत हे तपासणारी विज्ञान प्रश्नमंजुषा घेतली आणि अचूक उत्तर देणाऱ्या विद्यार्थ्यांना चॉकलेट देऊन प्रोत्साहित केले .

यानंतर विज्ञान प्रदर्शनी मध्ये विद्यार्थ्यांनी स्वयंप्रेरणेने निर्मित केलेले वैज्ञानिक प्रतिकृती , तक्ते यांचे परीक्षण करीत मान्यवरांनी विद्यार्थ्यांचे कौतुक केले . सर्व विद्यार्थी व शिक्षक शिक्षिका यांनी विज्ञान प्रदर्शनी मध्ये सादर केलेल्या वैविध्यपूर्ण प्रतिकृती व तक्ते यांची पाहणी केल्यानंतर कार्यक्रमाचा उत्साहाने समारोप करण्यात आला .

सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री सचिन नालिंदे सर यांनी तर सौ अर्चना भगत मॅडम यांनी कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन केले . श्री अविनाश देशमुख सर यांच्या नेतृत्वात सर्व शिक्षक शिक्षिका यांच्या सहकार्याने कार्यक्रम यशस्वीरित्या व मोठ्या दिमाखात संपन्न झाला.#युवासंघर्ष-डिजिटल मीडिया


