पुसद येथील माऊंट लिट्रा झी स्कूलमध्ये रमाबाई आंबेडकर यांची जयंती अतिशय उत्साहाने साजरी करण्यात आली.कार्यक्रमाची सुरुवात रमाबाई आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन व पुष्पहार अर्पण करून करण्यात आले .डॉ. बाबासाहेब आंबेडकर व रमाबाई यांच्या चार अपत्यांचे निधन झाले होते.एवढे मोठे दुःख पचवून त्यांनी सामाजिक शैक्षणिक कार्यात आपले आयुष्य वेचले . येणाऱ्या प्रत्येक अडचणीला या दाम्पत्यांनी प्रखरपणे तोंड दिले .डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या सामाजिक ,शैक्षणिक कार्यामध्ये रमाबाईंचे खूप मोठे योगदान आहे .त्यांनी केलेले त्याग व त्यांचे कार्य विद्यार्थ्यांना कळावे हा दृष्टिकोन ठेवून संस्थेचे संस्थापक अध्यक्ष विक्रम गट्टाणी, उपाध्यक्ष अमर आसेगावकर, सचिव संदीप जिल्हेवार,कोषाध्यक्ष रवी गट्टाणी, संचालक भागवत चिदरवार व सर्व संचालक मंडळाच्या मार्गदर्शनाने सदर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले .आकाश खंदारे यांनी रमाबाई आंबेडकर यांचे जीवन चरित्र व कार्य याविषयी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले .कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेचे मुख्याध्यापक नरेंद्रसिंग चाैव्हाण ,शाळा समन्वय सुशील दीक्षित ,प्रशासन अधिकारी नेहा सोळंकी ,सर्व क्रीडा प्रशिक्षक ,सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले .कार्यक्रमाचे सूत्रसंचलन व आभार अविनाश देशपांडे यांनी केले .


