मुख्य संपादक :-कुलदिप सुरोशे
पुसद : रिक्त असलेल्या पुसद पंचायत समिती गट विकास अधिकारी जागेवर पंचायत समिती अहमदपूर, जि. लातूर. येथे गट विकास अधिकारी म्हणून कार्यरत ए. डी. आंदेलवाड यांच्या नियुक्तीचे आदेश महाराष्ट्र शासनाच्या अवर सचिव डॉ. उर्मिला वैभव जोशी यांच्या स्वाक्षरीने आज निघाले. आंदेलवाड यांना तात्काळ रुजू होण्याचे आदेशात नमूद करण्यात आले आहे.

मागील २ वर्षांपासून (विधानसभा निवडणूक काळ वगळता) संजय राठोड यांचेकडे पुसद गटविकास अधिकारी म्हणून प्रभार होता. परंतु त्यांच्या कार्यकाळात ग्रामीण भागातील अनेक विकास कामे रखडली आहेत त्यांच्या कार्यकाळाची सखोल चौकशी केल्यास मोठे घबाड बाहेर येण्याची शक्यता नाकारता येत नाही,त्यामुळे नवनियुक्त गटविकास अधिकाऱ्यांनी पदभार स्वीकारताच भ्रष्टाचाराला आळा घालावा अशी जनतेची मागणी आहे.
नवनियुक्त गटविकास अधिकारी ए.डी. आंदेलवाड हे पंचायत समिती अहमदपूर जिल्हा लातूर येथे कार्यरत होते परंतु महाराष्ट्र शासनाचे अवर सचिव डॉ. उर्मिला वैभव जोशी यांच्या स्वाक्षरीने दि. २४ मार्च २०२५ रोजी आदेश काढून तात्काळ रुजू होण्याचे आदेश दिले,त्यानुसार ए.डी. आंदेलवाड यांनी दि. २४ मार्च रोजी पुसद पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी पदाचा पदभार स्वीकारल्यावर पुसद तालुका ग्रामसेवक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांच्या वतीने तसेच पंचायत समितीच्या विविध विभागाच्या कर्मचाऱ्यांच्या वतीने त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.
#युवासंघर्ष-डिजिटल मीडिया

