पुसद – अवघ्या अल्पकाळामध्ये गोरगरिबांना अन्नाचा घास पुरविणारी व प्रत्येक नागरिकांनी आपल्या वाढदिवसानिमित्त देणगीच्या माध्यमातून अन्नाचा घास गोरगरिबांना पुरविणारी एक सामाजिक जाणीव ठेवून कार्यरत असलेली माणुसकीची भिंत यांच्या सामाजिक उपक्रमाची दखल घेत व यांचं कार्य पाहण्यासाठी यशवंतराव चव्हाण सेंटर मुंबई येथील अभिसरण उपक्रमातील विद्यार्थ्यांनी पुसद येथे येऊन माणुसकीच्या भिंतीच्या उपक्रमाची उपजिल्हा रुग्णालय पुसद येथे व शनी मंदिर भेट देऊन पाहणी केली, व त्यांच्या कार्याचे कौतुक केले, माणुसकीच्या भिंतीमार्फत कपडे वाटप अन्नदान,रुग्णास मदत,घर जळालेल्या परिवारास मदत ,दिवाळी व इतर गरजवंतासोबत सोबत साजरे करणे दवाखान्यात मेडिकल किट व नवजात शिशूंच्या मातांना मदत या सर्व उपक्रमाबद्दल माहिती जाणून घेतली यावेळेस त्यांना सर्व टीमचे झाडाचे रोपटे देऊन माणुसकीची भिंत कडून स्वागत करण्यात आले व त्यांनी माणुसकीची भिंत सर्व उपक्रमाची माहिती घेतली व माणुसकीची भिंतीच्या मागील नऊ वर्षापासून अविरत सुरू असलेल्या कार्याचे कौतुक केले. यावेळेस उपस्थित मान्यवर माणुसकीच्या भिंतीचे मार्गदर्शक अजय झरकर, पत्रकार मारोती भस्मे विशाल डुबेवार, पत्रकार दीपक महाडिक विजय निखाते,प्रज्योत केशट्टीवार, हर्षद कदम,चैतन्य यादव,किरण यादव,साहिल पाटील,प्रतीक्षा खेडकर, अभिजीत जगताप,नीलिमा निकम,साक्षी घोलप, शिवानी इंदुलकर ,अभिषेक गुरव,तसेच माणुसकीच्या भिंतीचे गजानन जाधव,अनंता चतुर पंजाबराव ढेकळे संतोष गावंडे,धनंजय आघाम,दीपक घाडगे. माणुसकीची भिंत शुभचिंतक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
