मुख्य संपादक :-कुलदिप सुरोशे
पुसद.भारतीय जनता पार्टीने संघटनात्मक सोयीसाठी सुमारे अडीच वर्षांपूर्वी पुसद , दिग्रस , उमरखेड , महागाव , दारव्हा , नेर तालुक्याचा समावेश असलेल्या पुसद जिल्ह्याची निर्मिती केली होती. सर्वप्रथम नव्या पुसद जिल्ह्याच्या अध्यक्षपदाची माळ महादेवराव सुपारे यांच्या गळ्यात पडली होती.
आता पुन्हा एकदा नव्या जिल्हाध्यक्षाची निवड प्रक्रिया राबवल्या गेली. यासंदर्भात पुसद जिल्हा पक्ष कार्यालयात पर्यवेक्षक दिनेश सूर्यवंशी यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठक संपन्न झाली होती. या बैठकीच्या माध्यमातून असे दिसून आले की , भारतीय जनता पार्टीच्या पुसद जिल्हाध्यक्ष पदासाठी दहा पेक्षा जास्त इच्छुक व्यक्ती आहे.

सर्वांचे याच कडे लक्ष लागले होते की , पुसद जिल्हाध्यक्ष पदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार ? भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र यांनी दि. 13 मे 2025 रोजी प्रसिद्ध केलेल्या प्रसिद्धी पत्रकाच्या माध्यमातून जिल्हाध्यक्ष पदाचे चित्र स्पष्ट केले आहे. भारतीय जनता पार्टीच्या महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष डॉ.सौ.आरती फुपाटे यांची पुसद जिल्हाध्यक्ष पदासाठी निवड करण्यात आली आहे. आणि यामुळे डॉ.सौ.आरती फुपाटे यांचेवर अभिनंदनचा वर्षाव होत आहे.
डॉ.सौ.आरती फुपाटे यांनी आपल्या कार्याची जणसामान्यांमध्ये तसेच राजकीय वर्तुळात एक वेगळीच ओळख निर्माण केलेली आहे.आणि त्याचेच फलीत म्हणून आज पुसद जिल्हाध्यक्षपदाची माळ त्यांच्या गळ्यात पडली आहे.
#युवासंघर्ष-डिजिटल मीडिया

