तालुका प्रतिनिधी:-कुलदिप सुरोशे
पुसद.तालुक्यातील बेलोरा या गावातील रहिवासी असलेल्या एका 38 वर्षीय इसमाने त्याच्या राहत्या घरी दोरीने गळफास लावून आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. प्राप्त माहितीनुसार पुसद तालुक्यातील बेलोरा येथील रहिवासी असलेले विवेक दादाराव मस्के वय अं. 38 वर्षे यांनी काल दिनांक 24 फेब्रुवारी 2025 रोजी दुपारी अंदाजे 3.30 वाजताचे सुमारास त्यांचे राहते घरी दोरीच्या साहाय्याने गळफास लावून आत्महत्या केली.
या घटनेची माहिती ग्रामस्थांना होताच संपूर्ण गावात एकच खळबळ उडाली होती. ग्रामस्थांनी घटनेची माहिती तेथील पोलीस स्टेशन खंडाळा यांना दिली त्यानंतर पोलीस स्टेशन खंडाळा येथील पोलीस अधिकारी यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला व त्यानंतर सदरचे शव हे उपजिल्हा रुग्णालय पुसद येथे शवविच्छेदनाकरिता पाठविण्यात आले . विवेक मस्के याने आपल्या राहत्या घरी आत्महत्या का केली याचे कारण मात्र अद्यापही अस्पष्ट आहे. विवेक मस्के याच्या अशा अचानक जाण्याने त्याचे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून संपूर्ण बेलोरा परिसरात हळहळ व्यक्त केल्या जात आहे.#युवासंघर्ष-डिजिटल मीडिया.

