मुख्य संपादक:-कुलदिप सुरोशे
पुसद.आज दि.१७ मार्च रोजी माननीय शिक्षण मंत्री यांना उपविभागीय अधिकारी पुसद यांचे मार्फत पुसद तालुका कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक यांनी निवेदन दिले.
सदर निवेदनात प्रमुख मागण्या खालील प्रमाणे केल्या आहेत. १) जुनी पेन्शन योजना लागू करावी.२)मान्य केलेली टप्पा वाढ तरतुदीसह त्वरित लागु करावी ३)शिक्षकांना आश्वासित प्रगती योजना लागू करावी. ४)विद्यार्थी पटसंख्येचे निकष बदलावे. ५)शिकवायला शिक्षक द्या शिक्षक भरती त्वरित करा. )ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया रद्द करा७) शिक्षण क्षेत्रातील भ्रष्टाचार दूर करा. सदर निवेदन देताना विजुक्टा तालुका अध्यक्ष प्रा. नरेश राठोड ,तालुका सचिव प्रा गजानन जाधव, लोकमतचे प्रतिनिधी प्रा. एस एल राठोड प्रा भास्कर गरड, प्रा. रश्मी डेकाटे प्रा योगिता काष्टे प्रा. भाऊसाहेब देशमुख प्रा संतोष मुखरे, प्रा सैय्यद सलमान प्रा. निलेश जागृत , प्रा. वैभव पाटील प्रा. निलेश जाधव प्रा. आसिफ शेख, प्रा. अमोल राठोड प्रा. नितीन मारकड यासह पुसद तालुक्यातील उच्च माध्यमिक शिक्षक उपस्थित होते.
#युवासंघर्ष-डिजिटल मीडिया

