मुख्य संपादक :-कुलदिप सुरोशे
किनवट .दिनांक 05 जून 2025 रोजी गोपीकिशन मंगल कार्यालय गोकुंदा येथे किनवट-माहूर विधानसभेचे आमदार भीमरावजी केराम यांच्या उपस्थितीत वर्धापन दिनाचे उद्घाटक म्हणून युवा ग्रामीण पत्रकार संघाच्या देशव्यापी वर्धापन दिनानिमित्त सर्व पत्रकार बांधवांना त्यांनी शुभेच्छा दिल्या.

कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी युवा ग्रामीण पत्रकार संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष मा. श्री. गणेशजी कचकलवार यांची उपस्थिती होती. तर विशेष उपस्थिती म्हणून विजय सूर्यवंशी विभागीय अध्यक्ष, परमेश्वर पेशवे, विभागीय संघटक नांदेडचे जिल्हाध्यक्ष संभाजी सूर्यवंशी, जिल्हा उपाध्यक्ष आनंद शिनगारे, ज्येष्ठ पत्रकार दादाराव कयापाक, किनवटचे माजी उपनगराध्यक्ष श्रीनिवास नेमानिवार, अजय कदम युवासेना तालुका प्रमुख किनवट, सचिन वैद्य, युवा उद्योजक नैतिक नाईक, यांची मंचावर विशेष उपस्थिती होती.

कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलन करून करण्यात आली, तसेच किनवट माहूर दोन्ही तालुक्यातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला व त्यांना सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला, आणि आमदार भीमरावजी केराम यांच्या हस्ते देशव्यापी YGPS चॅनेलचे लोकार्पण करण्यात आले.

तसेच नांदेड जिल्ह्यातून आलेल्या उपस्थित पत्रकारांना उत्कृष्ट पत्रकार म्हणून आमदार भीमरावजी केराम व राष्ट्रीय अध्यक्ष श्री गणेश कचकलवार यांच्या हस्ते पुरस्कार वितरण करण्यात आले, पुसद येथील तालुकाध्यक्ष कुलदिप सुरोशे तालुका सचिव सूर्यकांत राठोड, शहराध्यक्ष ज्ञानेश्वर मेटकर यांनाही उत्कृष्ट पत्रकार म्हणून सन्मानचिन्ह देण्यात आले.तसेच विविध शैक्षणिक संस्था व त्या संस्थेतून अभ्यास करून विविध पदावर विराजमान झालेल्या विद्यार्थ्यांचा सुद्धा सत्कार करण्यात आला.

सदर कार्यक्रमाचे सुरेख सूत्रसंचालन प्राध्यापक विनोद कांबळे व सय्यद इसा यांनी केले. विशेष बाब म्हणजे संपूर्ण महाराष्ट्रातच नाही तर देशभरात जिथे-जिथे युवा ग्रामीण पत्रकार संघटना आहे तिथे वेगवेगळ्या सामाजिक उपक्रमाच्या माध्यमातून वर्धापन दिन साजरा करण्यात आला.

