मुख्य संपादक :-कुलदिप सुरोशे
पुसद.तालुक्यात अपघातांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. तसेच यां अपघातामध्ये निष्पाप नागरिकांना आपला जीव सुद्धा गमवावा लागत आहे.
काही दिवसांपूर्वी सुद्धा अशाच दोन वेगवेगळ्या अपघातात नागरिकांचा जीव गेला होता,आता पुन्हा नव्याने एकदा अशाच दोन वेगवेगळ्या अपघातात नागरिकांना आपला जीव गमवावा लागला आहे.
यात सविस्तर माहिती अशी की, काल दिनांक 21 मार्च 2025 रोजी रात्रीचे 10.30 वाजताचे सुमारास शहर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील इटावा वॉर्ड येथे एक इसम नामे प्रेमदास दुर्गासिंग जाधव हा पैदल जातं असताना अचानक येणाऱ्या बुलेट वाहन क्रमांक एम एच 29 बी के 3500 यां बुलेटणे त्यांना जोरदार धडक दिली. यां धडकेत प्रेमदास जाधव याचा जागीच मृत्यू झाला.

तर दुसरा अपघात हा आज दिनांक 22 मार्च 2025 रोजी सकाळी 9.30 ते 10 वाजताचे सुमारास सचिन रमेश राठोड हा त्याचे दुचाकीने धुंदी येथे जातं होता. धुंदी जवळील बेळगव्हाण येथे रेल्वेचे काम सुरु असल्याने तेथून माल ने आन करण्यासाठी ट्रकांची ये जा सुरु असते. सचिन राठोड हा त्याचे दुचाकीने जातं असताना अचानकपने त्या ट्रकला धडक बसल्याने त्याचा सुद्धा जागीच मृत्यू झाला.

यां दोन्ही अपघातातील मृतकांना उपजिल्हा रुग्णालय पुसद येथे शवविच्छेदन करिता पाठविण्यात आले. याबाबत प्रेमदास जाधव याचे वडिलांने पोलीस स्टेशन पुसद शहर येथे बुलेट चालका विरुद्ध रीतसर तक्रार दिली आहे व सचिन राठोड याच्या वतीने तक्रार देण्याची प्रक्रिया सुरु होती.
#युवा संघर्ष-डिजिटल मीडिया

