मुख्य संपादक :-कुलदिप सुरोशे
पुसद.शेंबाळपिंपरी येथिल अल्पभूधारक शेतकरी हनुमान रामकिसन मोरे यांनी मागील वर्षी मोजे जगापुर ता पुसद बालासाहेब संस्थान शेंबाळपिंपरी यांची शेत स.१०१मधील ३हेक्टर ही शेतजमिन इतरांकडून उसनवारी पैसे घेऊन सदर जमीन मक्त्याने केली होती. सध्या त्या शेतामधे खरिपचा हरबरा या पिकाची लावगड करुन मागील दोन ते तिन दिवसांपासून त्यांनी हरबरा कापुन शेतात गंजी लावन्यात आली होती. काल सायंकाळ पर्यत हनुमान मोरे शेतातच होते त्यानंतर ते घरी आले व घरी आल्यानंतर रात्री आंदाजे ८च्या सुमारास गंजी जळाल्याची माहीती त्यांना मिळाली.
त्यानंतर त्यांनी सदर घटनेची फिर्याद पोफाळी पोलीस स्टेशनमध्ये दिली असुन पोफाळी पोलीस स्टेशनच्या वतीने चौकशी सुरु करण्यात आली आहे. हरभरा पिकाची गंजी पेटवून दिली की कोणत्या दुसऱ्या कारणाने गंजी जळाली हे मात्र अस्पष्ट आहे. यामुळे किसन मोरे या शेतकऱ्याचे मात्र 3 ते 4 लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.
उपरोक्त शेतकरी खुप मेहनती आसुन लोकांचे शेत आर्धेनिम्मे पैसै देऊन शेती मक्त्याने करत आसतो.सध्या शेंबाळपिंपरी परिसरात शेती मक्त्याच्या वाढत्या कींमती व दरवर्षी होनारा कमी माल व उतरलेले शेतमाल भाव ह्यामुळे आधीच मेटाकुटीला आलेला शेतकरी व त्यात आशी हानी झाल्यामुळे युवा शेतकरी हनुमान रामकिसन मोरे ह्यांच्या बददल सध्या गावात हळहळ व्यक्त होत आहे.#युवासंघर्ष- डिजिटल मीडिया

