मुख्य संपादक:-कुलदिप सुरोशे
उमरखेड. तालुक्यात सध्या शेतकऱ्यांचा हळद काढणीचा हंगाम सुरु आहे . या कामाच्या लगबगीत शेतात हळदी यंत्राला ग्रीस लावतांना अंकुश रामचंद्र राणे वय 27 वर्ष रा. दिघडी याचा उजवा हात हळदी यंत्रात गेल्याने कोपरापर्यन्त तुटून चकणाचूर झाल्याची घटना येन गुढीपाडव्याच्याच दिवशी दि. 30 मार्च रोजी 4 वाजताचे सुमारास दिघडी शेत शिवारात घडली आहे .

दिघडी येथील 27 वर्षिय युवक अंकुश राणे हा शेतामध्ये हळद शिजविण्यासाठी यंत्रामध्ये ग्रीस लावत असतांना त्याचा उजवा हात यंत्रात गेल्याने तो कोपरा पर्यन्त तुटला.

मागील चार पाच दिवसात कुकरमध्ये हळद शिजवतांना हाकेच्या अंतरावरील शेजारील हदगांव तालुक्यात कुकरचा स्पोट होऊन त्यामध्ये 4 ते 5 शेतमजूर गंभीर जखमी झाले होते याची चर्चा परिसरातील शेतकऱ्यांमध्ये सुरु असतांना सदर घटना घडल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाली आहे . शेतकऱ्यांनी यंत्रांना काळजीपूर्वक हाताळावे असे आवाहन करण्यात येत आहे .
#युवासंघर्ष-डिजिटल मीडिया

