मुख्य संपादक :-कुलदिप सुरोशे
पुसद.तालुक्यातील खंडाळा पोलीस स्टेशनच्या हद्दीत येत असलेल्या शेंबाळ पिंपरी येथे सख्या भावानेच लहान भावाची केल्याची खळबळ जनक घटना घडली आहे.

यात प्राप्त माहिती नुसार पुसद तालुक्यातील शेंबाळपिंपरी येथे काल दिनांक 28 मार्च 2025 रोजी रात्री अंदाजे नऊ वाजता चे दरम्यान मनीष जयवंत शिरफुले याने त्याचा लहान भाऊ नामे दिनेश जयवंत शिरफुले यांच्यात किरकोळ कारणावरून वाद झाला या वादाचे रूपांतर हाणामारीत झाले त्यानंतर मनीष जयवंत शिरफुले याने त्याच्या लहान भाऊ दिनेश शिरफुले याला डोक्यात फावडे मारून गंभीर जखमी केले.

या मारहाणीत दिनेश जयवंत शिरफुले याच्या डोक्याला जबर मार लागला, त्यानंतर त्याला शेंबाळ पिंपरी येथील दवाखान्यात नेण्यात आले तोपर्यंत मृतक हा जिवंतच होता, नंतर त्याला पुसद येथील शासकीय उपजिल्हा रुग्णालय पुसद येथे नेण्यात आले परंतु डॉक्टरांनी दिनेश याला मृत घोषित केले. तोवर आरोपी हा घटनास्थळावरून प्रसार झाला असून पोलिसांचे 3 पथक आरोपीचा शोध घेत आहेत.

आरोपी मनीष जयवंत शिरफुले याच्याविरुद्ध पो.स्टे.खंडाळा येथे भारतीय न्यायसंहितेचे कलम 103, 115 (2),352,351(2) नुसार गुन्हे नोंद करण्यात आले आहे.घटनेचा अधिक तपास उपविभागीय पोलीस अधिकारी हर्षवर्धन बीजे यांच्या आदेशान्वये पो.स्टे.खंडाळा येथील पो.नि देविदास पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असून लवकरच आरोपी अटक करण्यात येईल असे सांगण्यात आले.
#युवासंघर्ष-डिजिटल मीडिया

