पुसद तालुक्यात व शहरात अपघाताचे सत्र सुरूच आहे. मागील काही महिन्यात शहरात व तालुक्यात अनेक अपघात झाले व या अपघातात अनेक निष्पाप नागरिकांना आपला जीव गमवावा लागला आहे. असाच अजून एक अपघात आज दिनांक 8 मार्च 2025 रोजी वरुड येथे झाला. यात प्राप्त माहितीनुसार पुसद पासून जवळच असलेल्या वरुड येथे टिप्पर ट्रक व मोटरसायकल यांची समोरासमोर धडक होऊन मोटरसायकल वरील अमोल प्रल्हाद राठोड वय वर्ष 29 राहणार आश्विन पुर वरुड हा जागेवरच ठार झाला तर दुचाकीवर त्याच्या सोबत असलेले दोघेजण गंभीर जखमी झाले. मोटरसायकल क्रमांक एम एच 29 बी यु 54 99 हिरो स्प्लेंडर या गाडीने वरुड कडून अश्विन पुर कडे तिघेजन मोटर सायकलने जात असताना दिग्रस कडून पुसद कडे येत असलेल्या ट्रक क्रमांक एम एच 29 बी ई 45 81 याने सदर दुचाकीला जोरदार धडक दिल्यामुळे अमोल राठोड हा जागेवरच ठार झाला तर अन्य दोघेजण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना पुसद येथील रुग्णालयामध्ये नेण्यात आले

