मुख्य संपादक:-कुलदिप सुरोशे.
पुसद.नांदेड येथे नुकतेच उर्दूचे विविध क्षेत्रातील विशेष कार्य करणाऱ्या व्यक्तींना त्यांच्या कार्याची दखल घेत त्यांना पुरस्कृत करण्यात आले. यामध्ये येथील नजीर आफताब सरांच्या शैक्षणिक कार्याची दखल घेऊन त्यांना राष्ट्रीय पातळीवरचा उर्दू पुरस्कार २०२५ ने राष्ट्रीय उर्दू शिक्षक कर्मचारी संघ इंडिया चे अध्यक्ष चौधरी वासील अली यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. नजीर आफताब हे उर्दु जनता शिक्षण प्रसारक मंडळ कनिष्ठ महाविद्यालय कला फुलसावंगी येथे इंग्रजी भाषेचे प्राध्यापक असून उर्दूचे कवी आहेत.याप्रसंगी प्रतिष्ठित व्यक्ती एम आय एम चे नेते सय्यद मोईन आणि राष्ट्रीय उर्दू शिक्षक कर्मचारी संघ चे अध्यक्ष चौधरी वासिल अली, मराठवाडा उर्दू डीएड कॉलेजचे अध्यक्ष एडवोकेट कादरी, व कलीम डांगे उपस्थित होते.
