मुख्य संपादक:-कुलदिप सुरोशे

पुसद.काल दिनांक 12 मार्च 2025 रोजी रात्री नऊ वाजताच्या सुमारास चाणक्य ट्रॅव्हल्स क्रमांक AR 01 Y 4544 ही ट्रॅव्हल्स दिग्रस वरून पुसद कडे येत होती तसेच एक मोटर सायकल स्वार त्याची मोटरसायकल क्रमांक एम एच 29 बी झेड 4838 ही घेऊन घराकडे जातं असताना वरुड येथील महादेव मंदिराजवळ चाणक्य ट्रॅव्हल्स ने दुचाकी स्वाराला जोरदार धडक दिली. ही धडक इतकी जोरात होती की दुचाकी स्वाराचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला.

सदर मोटरसायकल स्वराच्या गाडीतून मिळालेल्या कागदपत्रांवरून त्याचे नाव प्रदीप चव्हाण कवडीपूर असे असल्याचे समजले. प्रत्यक्षदर्शीनी माहिती सांगितली की ट्रॅव्हल्स अतिशय वेगात होती त्यामुळे धडक दिल्यानंतर मोटरसायकल स्वराचा जागेवरच दुर्दैवी मृत्यू झाला.

सदर घटनेनंतर घटनास्थळी वसंत नगर पोलिस स्टेशनचे पोलीस कर्मचारी पोहोचले व त्यांनी घटनास्थळचा पंचनामा केला.#युवासंघर्ष-डिजिटल मीडिया


