मुख्य संपादक:-कुलदिप सुरोशे
पुसद,-शिवसेना पुसद जिल्हा यवतमाळ उद्धवजी बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेबांबद्दल अपशब्द वापरणाऱ्या उपसभापती श्रीमती नीलम गोरे यांचा पुसद येथील शिवसैनिकांनी दिनांक 24/02 /2025 सोमवार रोजी उपविभागीय दंडाधिकारी साहेब पुसद यांच्या कार्यालयात त्यांना निवेदन देण्यात आले.
या निवेदनामध्ये श्रीमती नीलम गोरे यांनी दिल्ली येथे मराठी साहित्य संमेलनामध्ये मिंदे गटाचे आमदार व विधान परिषदेचे उपसभापती असलेल्या जबाबदार व्यक्तीने हेतू पुरस्कर व प्रसिद्धीच्या आवाशा पोटी जाणून-बुजून शिवसेना पक्षप्रमुख यांचे वर आरोप करून तेही राजकीय व्यासपीठ नसताना दिल्ली येथे मराठी साहित्य संमेलनामध्ये केले. जी बाई स्वतः चार वेळा एक वेळा उपसभापती पद उद्धवजी ठाकरे यांच्या आशीर्वादाने भोगले त्यांचे वर आरोप करते केवळ स्वतःला प्रसिद्धी मिळून घेण्याकरिता आरोप करत आहे.
श्रीमती नीलम गोरे यांनी स्वतःकडे झाकून पाहावे आपण कोण होतो काय होतो कोणामुळे होतो तुम्ही आज जे काय ते वावरत आहात त्याबद्दल आत्म चिंतन करा व अशा जबाबदार पदावर असणाऱ्या व्यक्तीने अशी खोटी माहिती देऊन जनतेची प्रशासनाची दिशाभूल करीत आहे. त्यांच्यावर त्वरित कारवाई करण्यात यावी असे पुसद शिवसेनेच्या वतीने उपविभागीय अधिकारी यांचे कार्यालयात तहसीलदार वाघमारे मॅडम यांना निवेदन देण्यात आले.
या निवेदनावर रवी पांडे तालुकाप्रमुख , विकास जामकर सह संपर्कप्रमुख, विजय बाबर विधानसभा संघटक, हरीश गुरु आणि शहरप्रमुख, एडवोकेट वीरेंद्र राजे,मोहन विश्वकर्मा तालुका संघटक , रवि बहादुरे, पप्पू ठाकूर,सूर्यकांत भोने उपजिल्हा संघटन, शंकर माटे, निखिल दशरथे, विजय आलोने, सय्यद गासूद्दीन गजानन फुलाते, सौ मालतीताई मिश्रा तालुका महिला आघाडी प्रमुख, सौ, अश्विनी वीरेंद्र राजे,तालुका महिला आघाडी सौ अनिता बहादुरे, सौ विद्या पोहरकर महिला आघाडी , सौ. माया दिगंबर फरकाडे , सौ रेणू विनायक वानखेडे यांच्या अनेक शिवसैनिक व नागरी उपस्थित होते.
#युवा संघर्ष-डिजिटल मीडिया

