मुख्य संपादक:-कुलदिप सुरोशे
पुसद. आज दिनांक 19 फेब्रुवारी रयतेचे राजे हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची 395 जयंती संपूर्ण महाराष्ट्रासह पुसद शहरात सुद्धा मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यानिमित्ताने रात्री 12.00 वाजता छत्रपती शिवाजी महाराज चौकात फटाक्याच्या आतिशबाजी सह मोठ्या जल्लोषत जन्मोत्सव साजरा करण्यात आला.

तसेच दिनांक 19 फेब्रुवारी 2025 रोजी सकाळी ठीक 8.39 वाजता छत्रपती शिवाजी महाराज चौक पुसद येथे शिवपूजन करून ठीक 9.30 वाजता भव्य अशा मोटरसायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. त्यानंतर दुपारी दोन वाजता भव्यदिव्य अशी शोभायात्रा सुद्धा काढण्यात आली.

या शोभायात्रेत आदियोगी झाँकी,अकोला आदिवासी नृत्य पांढरकवडा, बंजारा नृत्य झाँकी, मर्दानी पथक दर्यापूर, मल्लखांब पथक खामगाव, श्रीराम हरिपाठ पथक बेंबळा,दुर्गा वहिनी लाठीकाठी पथक पुसद, युवा जल्लोष ढोल पथक, पुसद,रामराज्य ढोल पथक पुसद, व उत्तम चापकेंचा शिवकालीन जिवंत देखावा तसेच विविध शाळांचे लेझीम पथक,ध्वज पथक,सांस्कृतिक नृत्य आणि शिवकालीन देखावे अशा विविध देखाव्याने अखंड हिंदुस्तानचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शोभायात्रेला भव्यदिव्य असे स्वरूप प्राप्त झाले होते.

सदर शोभायातत्रेला श्री शिवाजी विद्यालय पुसद येथून सुरुवात करून छत्रपती शिवाजी महाराज चौक,नेताजी सुभाष चंद्र बोस चौक, नागीना चौक, चंद्रशेखर आझाद चौक, राष्ट्रपिता महात्मा गांधी चौक, व महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक येथे या शोभायात्रेचा समारोप करण्यात आला.


