मुख्य संपादक:-कुलदिप सुरोशे
पुसद. याही वर्षी प्रभू श्री विश्वकर्मा जयंती शहरालगत असलेल्या निंबी व श्री धनकेश्वर मंदिरा लगत असलेल्या प्रभू श्री विश्वकर्मा यांच्या मंदिरामध्ये येथील दि. 10फेब्रुवारी रोजी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. 10 फेब्रुवारी पहाटे सकाळी 7.30वाजता होम हवन, श्रींचा दुग्ध अभिषेक व आरती मान्यवरांच्या हस्ते संपन्न झाली.सकाळी 11.00वाजता मुख्य मुख्य कार्यक्रमाचे व महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी व्यासपीठावर कार्यक्रमाचे कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी दीपक परिहार, शहर भाजप अध्यक्ष होते.तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रकाशराव सावंत होते तर प्रमुख पाहुणे म्हणून l पत्रकार दीपक महाडिक, इलेक्ट्रॉनिक मीडियाचे पत्रकार ऋषिकेश जोगदंडे,उत्तमराव जोहरकर, नामदेवराव गव्हाणे, साहेबराव खोलगडे, विठ्ठल जाधव सरपंच पार्डी, साहेबराव शिंदे डॉ. विवेक फुलउंबरकर, दिलीप पैठणकर आदी मान्यवर उपस्थित होते.सर्वप्रथम मान्यवरांच्या हस्ते प्रभू श्री विश्वकर्मा यांचे प्रतिमेचे पूजन, आरती करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. उत्तमराव जोहरकर सर यांनी प्रास्ताविक केले.त्यानंतर प्रमुख अतिथी दीपकभ परिहार यांनी आपल्या भाषणातून उपस्थित भाविक भक्तांची संवाद साधला. यावेळी त्यांनी ना. इंद्रनील मनोहरराव नाईक राज्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांचा संदेश उपस्थित त्यांना वाचून सांगितला, राज्याचे उद्योग राज्यमंत्री, इंद्रनील नाईक यांनी शहर भाजपा अध्यक्ष दीपक परीहार यांना या कार्यक्रमासाठी आपले प्रतिनिधी म्हणून पाठविले होते. तसेच सामाजिक कार्यकर्ते ऍड. सौ.मोहिनी इंद्रनील नाईक नाईक यांनी मंदिराच्या सभागृह बांधकामा संदर्भातली या मंडळाचे अध्यक्षांची व सदस्यांची मागणी त्यांनी मनावर घेतली आहे. गतवर्षीच्या प्रभु विश्वकर्मा जयंतीच्या कार्यक्रमाला या उपस्थित होत्या व त्यावेळी त्यांनी यांना तसे आश्वासन दिले होते. मात्र काही तांत्रिक अडचणीमुळे सभागृहासाठी 25 लाखाचा निधी उपलब्ध होऊ शकला नव्हता. अत्यंत घाई गडबडीच्या काळामध्ये 10फेब्रुवारी त्यांना व मंत्रिमहोदयांना तातडीने बाहेरगावी जावे लागले. त्यांनी आपले प्रतिनिधी म्हणून शहर भाजप अध्यक्ष दीपक परीहार यांना कार्यक्रम गाठावा व आमच्यातर्फे उपस्थित भाविक भक्तांना आश्वस्त करावे असे त्यांनी सांगितले. पुढील काही महिन्यांत बांधकामाला सुरवात होईल असे आश्वासन दिले. त्यानुसार दीपक परिहार यांनी यासाठी मी स्वतः पाठपुरावा करून सभागृह बांधकाम करूनच घेऊ असा विश्वास बोलून दाखविला. प्रभू श्री विश्वकर्मा सर्व विश्वाचे निर्माते आहे त्यांनी आपल्या कलेने विश्व निर्माण केले त्यांची आपण वंशज आहोत याचा आपणा सर्वांना अभिमान असावा असे सांगीतले. तसेच यावेळी व्यासपीठ अमोलभाऊ प्रकाशराव पैठणकर यांचे सर्व मान्यवरांनी पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले. व पुढील वाटचालीकरिता भरभरून शुभेच्छा दिल्या. तदनंतर महाप्रसादचा लाभ भाविक भक्तांनी घेतला या कार्यक्रमाच्या यशस्विते करिता प्रभू श्री विश्वकर्मा मंडळाचे सर्व सदस्य जयंत राजुरकर, गजानन पैठणकर ,सचिन पैठणकर, सुधीर पैठणकर, सतीश पैठणकर, श्रीराम रावते, गजानन खोलगाडगे, अशोक कुमकर, सोपानदेव पैठणकर, विठ्ठल पैठणकर, हरि विलायते ,राजू पैठणकर, अक्षय फुलउंबरकर, सतीश पैठणकर,सुरज पैठणकर , आदित्य फुलउंबरकर,विकी पैठणकर, गोविंद शिंदे गजानन परमळकर ,शुभम पैठणकर, गोविंद सूर्यवंशी, अनंत शिंदे,यश रावते, अवधूत कुमकर, सचिन इंगळे,पांडुरंग कुमकर, आदित्य पैठणकर, वसंता पैठणकर, अनंता पैठणकर ,बाळू घाटोडकर ,ऋषिकेश पांडे, कैलास पैठणकर पप्पू घाटोडकर, गजानन गायकवाड, श्रीकांत पैठणकर, अर्णव पैठणकर ,तुषार पैठणकर, संतोष पैठणकर, बाळू इंगळे अजिंक्य पैठणकर, शिवप्रसाद यशवंतकर, अभय पैठणकर, कुणाल पैठणकर, आदींनी परिश्रम घेतले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री अरूण तांबूसकर सर यांनी केले तर आभार प्रदर्शन श्री अक्षय पैठणकर यांनी मानले. यावेळी मोठ्या संख्येने भाविक भक्तांनी उपस्थिती दर्शविली.

