मुख्य संपादक –कुलदीप सुरोशे
पुसद.तालुक्यात आज दिनांक 5 मार्च 2025 रोजी RCP पथकाने प्रतिबंधित सुगंधित गुटख्यावर कारवाई करत 1 लाख 16 हजार 400 रुपयांचा मुद्देमाल जप्त करून दोन्ही आरोपीना अटक करण्यात आली आहे.
यात प्राप्त माहितीनुसार आज दिनांक 5 मार्च 2025 रोजी RCP पथकाकडून प्रतिबंधित सुगंधित गुटखा तंबाखूच्या दोन वेगवेगळ्या ठिकाणी कारवाई करण्यात आली. या कारवाईत मुंगशी येथे शालिकराम रामजी आडे यांच्या घरात प्रतिबंधित सुगंधित गुटखा असल्याची माहिती RCP पथकाला मिळाल्यानंतर सदर पथकाने मुंगशी येथे सकाळी अंदाजे 5.30 ते 6.00 वा दरम्यान जाऊन त्याचे घरातून प्रतिबंधित सुगंधित गुटखा अंदाजे किंमत 41504 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. तसेच दुसरी कारवाई ही सकाळी 8 वाजताचे सुमारास बजरंग नगर पिंपळखुटा येथे आरोपी सैय्यद मोसीन सैय्यद नाजीम रा. वसंत नगर पुसद हा प्रतिबंधित सुगंधित गुटखा घेऊन विक्री करण्याकरिता बजरंगनगर पिंपळखुटा येथे गेला असल्याची माहितीवरून RCP पथकाने त्यांचेवर कारवाई करत अंदाजी 14 हजार 896 रुपयांचा सुगंधित गुटखा व त्याचे दुचाकी वाहन किंमत 60 हजार रुपये असा 74 हजार 896 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. सदरची दोन्ही कारवाई ही मा. जिल्हा पोलीस अधीक्षक श्री.कुमार चिंता यांचे आदेशानुसार व उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. हर्षवर्धन बी जे यांचे मार्गदर्शनाखाली RCP पथक अभिजित सांगळे, सौरभ लोखंडे, तुळशीदास आमटे, नेहा चव्हाण, पराग गिरनाळे, इरफान अगवान, मुरलीधर पांडुळे, संदळी चहांडे यांनी पार पाडली.
#युवासंघर्ष-डिजिटल मीडिया.

