तालुका प्रतिनिधी:-कुलदिप सुरोशे
पुसद. आज दिनांक 19 फेब्रुवारी रयतेचे राजे हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची 395 जयंती संपूर्ण महाराष्ट्रासह पुसद शहरात सुद्धा मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यानिमित्ताने रात्री 12.00 वाजता छत्रपती शिवाजी महाराज चौकात फटाक्याच्या आतिशबाजी सह मोठ्या जल्लोषत जन्मोत्सव साजरा करण्यात आला. तसेच दिनांक 19 फेब्रुवारी 2025 रोजी सकाळी ठीक 8.39 वाजता छत्रपती शिवाजी महाराज चौक पुसद येथे शिवपूजन करून ठीक 9.30 वाजता भव्य अशा मोटरसायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले होते.

सदर मोटर सायकल रॅली ही श्री शिवाजी विद्यालय पुसद येथून छत्रपती शिवाजी महाराज चौक या मार्गाने फुलसिंग नाईक महाविद्यालय सुधाकरराव नाईक यांच्या पुतळ्यापासून वापस छत्रपती शिवाजी महाराज चौक बस स्टॅन्ड चौक श्रीरामपूर मार्गे बाबासाहेब नाईक अभियांत्रिकी महाविद्यालय कडून परत छत्रपती शिवाजी महाराज चौक मधून वाशिम रोड मार्गे वापस येऊन छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे रॅलीचा समारोप करण्यात आला.


