मुख्य संपादक:-कुलदिप सुरोशे
पुसद. जवळच असलेल्या केदारेश्वर नगर धनकेश्वर मंदिराच्या बाजूला फिर्यादी भगवान श्रीकृष्ण भोरकडे हे राहत असून पुसद पंचायत समिती कनिष्ठ लिपिक या पदावर आहेत दररोज ते आपल्या दुचाकीने येणे जाणे करतात, दिनांक २२ फेबु २०२५ रोजी चे रात्री ९ वाजता सुमारास त्यांनी सिनेमा पाहुन घरी आले व दुचाकी घराचे कंम्पाऊंड मध्ये लावून घरी झोपी गेले सकाळी २३ फेब्रु २५ चे स ६ः३० वा घरातून बाहेर आले असता त्यांनी पाहिले तर त्यांच्या दुचाकी एम एच २९ झेड ८९०६ हिरो होंडा सिडी डिलक्स लाल रंग चे दोन्ही टायर मॅकव्हिल किंमत अंदाजे ४५०० रुपये हे चोरी गेल्याचे दिसून आले.
त्यांनी शेजारी विचारपूस केली व इतरत्र शोध घेतला असता मिळून गाडीचे टायर कुठेही आढळून आले नसल्याने फिर्यादी ने वसंत नगर पोलीस स्टेशन गाठून फिर्याद नोंद केली आहे. अज्ञात आरोपी विरुद्ध वसंत नगर पोलीस स्टेशन मध्ये भारतीय न्याय संहिता बी एम एस २०२३ चे कलम ३०३ (2) नुसार गुन्हा नोंद करण्यात आला असून पुढील तपास वसंत नगर पोलीस हे करीत आहेत.#युवासंघर्ष-डिजिटल मीडिया

