मुख्य संपादक :-कुलदिप सुरोशे
पुसद.काल दिनांक 26 मार्च 2025 रोजीच्या रात्री अंदाजे 7.30 ते 8.00 वाजताच्या सुमारास पुसद शहर पोलीस स्टेशन हद्दीतील बस स्टँड पाण्याच्या टाकीजवळ असलेले एका हॉटेलमध्ये उधार का दिले नाही म्हणून चक्क हॉटेलची तोडफोड करण्यात आली.यादरम्यान हॉटेलमधील कर्मचाऱ्यांसोबतही धक्काबुक्की झाल्याची माहिती सुद्धा प्रथमदर्शनी दिली.

सविस्तर माहिती अशी की , छत्रपती शिवाजी महाराज वार्ड येथील रहिवासी असलेले जीवन चिंतामण व्यवहारे यांचे बस स्टॅन्डच्या बाजूला पाण्याच्या टाकीजवळ असलेले आदेश मुंगवडा सेंटर येथे काल दिनांक 26 मार्च 2025 रोजी च्या रात्री अंदाजे पावणे आठ ते आठ वाजताच्या सुमारास काही तरुण आले,त्यांनी उधार नाश्त्याची मागणी केली,परंतु हॉटेल मालकानी नकार दिल्याने त्या तरुणांनी चक्क हॉटेलमध्ये तोडफोड करत ठेवलेल्या सर्व सामानाची नासधूस केली.

या दरम्यान आलेल्या तरुणांनी हॉटेलमधील कर्मचाऱ्यांसोबत सुद्धा हातापायी केल्याची घटना घडली असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. आलेले तरुण हे मद्यपान करून होते व संभाजीनगर येथील असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. यामध्ये हॉटेलचे अंदाजे पंधरा ते विस हजार रुपयाचे नुकसान झाले असल्याची माहिती हॉटेल मालका मार्फत मिळाली आहे.

तोडफोड करणारे इसम हे मध्यधुंद अवस्थेमध्ये असल्यामुळे चक्क गॅस सिलेंडर ची टाकी हे दुकान मालकाच्या डोक्यात उचलून घालत असताना स्थानिक गुन्हे शाखेचे कर्तव्यदक्ष पो. शी.सुनील पंडागळे हे तिथून जात असतांना यांनी मारेकरीच्या हातातील टाकी हिसकावल्याने मोठा अनर्थ टळला. हे विशेष..!
#युवासंघर्ष-डिजिटल मीडिया

