मुख्य संपादक:-कुलदिप सुरोशे
पुसद- आज दिनांक १५/०२/२०२५ ला जगदगुरु संत सेवालाल महाराज यांच्या जयंती निमित्त निसर्गातील ऋतू चा सोहळा साजरा करीत असताना भौगोलिक दृष्ट्या साडेतेवीस अंशानी कललेली पृथ्वी सूर्याभोवती फिरत असल्याने पृथ्वी वर ऋतू चक्र निर्माण झाले आहेत यामध्ये वसंत ग्रीष्म वर्षा शरद हेमंत आणि शिशिर असे सहा ऋतू चक्र मानले जातात वर्षा मधल्या पाऊस धारा शरद मधले टिपुर चांदने ग्रीष्माचा वैशाख वणवा शिशिराची गुलाबी थंडी प्रत्येक ऋतूत निसर्गाचे रुप वेगवेगळे आहेत पण निसर्गाचे लावण्य खर्या अर्थाने बहरत ते मात्र वसंत ऋतूत आणि म्हणून वसंत हा ऋतूचा राजा ऋतूपती ऋतूराज ठरतो हिच संकल्पना घेऊन शाळेचे मुख्याध्यापक के. डी डाखोरे यांनी आज शाळेत विद्याथ्र्यांना वसंत मध्ये बहरलेल्या फुलांची माहिती व्हावी या उद्देशाने शाळेत वसंतोत्सव फुलांचे प्रदर्शन कार्यक्रम आयोजित आला होता प्रदर्शन कार्यक्रमाचे अध्यक्ष व उदघाटक धिरज आडे साहेब प्रशासन अधिकारी नगर परिषद पुसद व प्रमुख अतिथी म्हणून देवानंद मोहिते केंद्र प्रमुख न. प. तसेच सुनील जाधव मुख्याध्यापक तथा राज्य अध्यक्ष नपा व मनपा शिक्षक संघ महाराष्ट्र राज्य हे होते यावेळी फुलांच्या प्रदर्शनामध्ये आंबा मोहर पिवळा धमक अमलतास पळस केशरी पिवळा रंगाचे नीलमोहर ताम्हिणी अंजनी निळसर फुले मोहरी सरसो पांढरे कमळ चमेली मोगरा निलोत्पल बकुळ झेंडू जास्वंद गणेरी तुळस गांजर रुचकी सदा फुले कणेरी शेवंती स्वस्तीक गुलाब धोतरा गुलमोहोर मधुमालती पारिजात नलिनी सूर्यफूल कमळ चाफा कृष्ण कमळ निशीगंधा जाई अबोली सोनचाफा चंपा ईत्यादी निसर्गातील फुले प्रदर्शन मध्ये ठेवण्यात आली होती याप्रसंगी उद्घाटक धिरज आडे साहेब यांनी सृष्टी मधील अनेक फुलांची माहिती प्रदर्शना मधून देण्याची सोय ह्या शाळेने केली हे विद्यार्थीचे मी भाग्य समजतो असेच नवीन नवीन उपक्रम इतर शाळे़नी राबवून पुस्तकाव्यतीरिक्त ज्ञान मुलांना द्यावे असे आव्हान केले शाळेतील मुलांनी फुला विषयी संपूर्ण माहिती समजून घेतली यावेळी शाळा व्यवस्थापन समिती चे सर्व पदाधिकारी व माता पालक बहुसंख्येने उपस्थितीत होते तसेच शिवाजी टारफे मुख्याध्यापक गजानन अंभोरे मुख्याध्यापक हिरामण माहुरे मुख्याध्यापक यांनी प्रदर्शन ला भेट दिली कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. डी डाखोरे यांनी केले व अर्चना म्हैसकर यांनी आभार मानले.

