मुख्य संपादक :-कुलदिप सुरोशे
पुसद.वाशीम जिल्ह्यातील एका शेतशिवारात विहीरीत पडलेल्या बिबट्याला पुसद वनविभागाच्या जलद कृती दलाने जीवदान दिले.वाशिम जिल्ह्यात पुसद वनविभागाची उत्कृष्ट कामगिरी दिसून आली. सविस्तर वृत्त असे की वाशिम जिल्ह्यातील मानोरा तालुक्यातील हातोली शेत शिवारातील एका शेतकऱ्याच्या विहिरीत १२ मार्चला बिबट्या पडल्याची माहिती वाशिम वनविभागाला मिळाली होती.
त्यांनी बिबट्याला बाहेर काढण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले,मात्र बिबट्या काही हाती लागत नव्हता. शेवटी पुसद येथील जलद कृती दल (RRU) टिमला माहिती देऊन बिबट्याला बाहेर काढण्याच्या मदतीसाठी बोलाविण्यात आले. सदर टीम हि काही वेळातच घटनास्थळी दाखल झाली, व त्यांनी घटनास्थळाची पाहणी करून पिंजरा विहिरीत सोडला आणि तीन तासांच्या अथक परिश्रमानंतर त्या विहिरीत पडलेला बिबट्याला पिंजऱ्यात जेरबंद करण्यात यशस्वी झाले.

अशी उल्लेखनीय कामगिरी डॉ. बी.एन.स्वामी उपवनसंरक्षक यांच्या मार्गदर्शनात पुसद कृती दलाचे प्रमुख शेख मुखबिर शेख गुलाब,वनक्षेत्रपाल (फिरते) रवि राठोड, वनरक्षक गिरीश डांगे, अश्विन राठोड, केशव गेडाम, किरण सातपुते, तेजस पांढरे आणि वाशिम वन अधिकारी कर्मचाऱ्यांनी संयुक्त ही कामगिरी यशस्वीपणे पार पडली. काही दिवसांच्या देखरेखी नंतर बिबट्यास वन अधिवासात सोडण्यात आले.
#युवासंघर्ष-डिजिटल मीडिया

