मुख्य संपादक:-कुलदिप सुरोशे
पुसद उपजिल्हा रुग्णालयातील घटना: वैद्यकीय समितीच्या अहवालानंतर कारवाई
पुसद. येथील उपजिल्हा रुग्णालयात डॉक्टरांचा हलगर्जीपणा व चुकीच्या पद्धतीने उपचार केल्याने एका गर्भवतीचा प्रसूतीदरम्यान रक्तस्राव होऊन मृत्यू झाला. या प्रकरणी महिला वैद्यकीय अधीक्षकावर पुसद शहर पोलिसांनी गुन्हा नोंदविला. डॉ. मीनल भेलोंडे पवार असे गुन्हा नोंद झालेल्या महिला वैद्यकीय अधीक्षकांचे नाव आहे.

मृत्यूची घटना १९ मार्च २०२४ ची असून, या प्रकरणात २० मार्च 2025 रोजी एक वर्षानंतर वैद्यकीय समितीच्या अहवालावरून गुन्हा दाखल झालाय. प्रदीप शिवाजी धाईस्कर (३०) रा. सावरगाव गोरे, असे तक्रारदाराचे नाव आहे. भाग्यश्री प्रदीप धाईस्कर या महिलेला १८ मार्च २०२४ रोजी उपजिल्हा रुग्णालयामध्ये प्रसूतीसाठी आणले होते,त्यावेळी तेथील नर्सने सिझरसाठी यवतमाळ येथे खासगी दवाखान्यात नेण्याचा सल्ला दिला होता.
अर्जदार हा पत्नीला यवतमाळ येथे घेऊन जाण्यासाठी तयार होता,मात्र डॉ. मीनल भेलोंडे (पवार) या तिथे आल्या व माझ्या खासगी दवाखान्यात सिझर केले तर तुम्हाला ५० हजार रुपये खर्च लागेल. सरकारीत सिझर केल्यास २० हजार रुपये लागेल असे त्यांनी सांगितले. त्यानंतर डॉ. मीनल पवार यांनी सायंकाळी भाग्यश्रीचे सिझर केले व लगेच ५ ते १० मिनिटांनी भाग्यश्रीला बेडवर आणून टाकले. मात्र, एक तासाने भाग्यश्रीला रक्तस्राव सुरू झाला होत डॉक्टर व नर्सला सांगूनही त्यांनी दुर्लक्ष केले.
डॉ. भेलोंडे या रात्री ११ वाजता आल्या आणि त्यांनी कोणताही उपचार न करता खासगी रुग्णालयात भरती करण्याचा सल्ला दिला. खासगीत ६० ते ६५ हजार रुपयांचा खर्च आला असता तेथूनही महिलेला यवतमाळ येथे रेफर करण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला. दरम्यान भाग्यश्रीचा मृत्यू झाला.
#युवासंघर्ष-डिजिटल मीडिया

