मुख्य संपादक:-कुलदिप सुरोशे
पुसद.होळी व रंगपंचमीच्या पार्श्वभूमीवर पुसद ग्रामीण पो.स्टे अंतर्गत येत असलेल्या गावांमध्ये एकूण 6 वेगवेगळे पथक तयार करून अवैध दारू हातभट्टी व विक्री करणारे यांच्या एकूण 13 केस (ज्यामध्ये RCP 3 केसेस) करण्यात आले.
पोलिसांना सदर छाप्या मध्ये हस्तगत झालेला एकून मुद्देमाल व किंमत या प्रमाणे आहे. 1350 लिटर सडवा मोहामाल किंमत 64050 रू., 160 लिटर गावठी हात भट्टी दारू किंमत 16,000/- रू., 102 देशी संत्रा 90 मिली च्या बॉटल किंमत 3570/- रू, असा एकूण किंमत 83,6,20/- रू चां मुद्देमाल जप्त करण्यात आला.
सदरची कारवाई पोलीस अधीक्षक कुमार चिंता, पीयुष अपर पोलिस अधीक्षक जगताप, अति. पोलीस अधीक्षक हर्षवर्धन बी.जे.यांच्या मार्गदर्शनाखाली पुसद ग्रामीण पोलीस स्टेशनचे प्रभारी ठाणेदार सपोनी सुरेंद्र राऊत, पी एस आय लोंढे, पी एस आय देशमुख, पी एस आय चव्हाण, पीएसआय जब्बार व पो. स्टे मधील अंमलदार यांनी केली.
#युवासंघर्ष-डिजिटल मीडिया

