मुख्य संपादक:-कुलदिप सुरोशे
पुसद. दि. 1 जुलै हरित क्रांतीचे प्रणेते महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पुसदचे थोर सुपुत्र, कै. वसंतरावजी नाईक यांच्या 112 व्या जयंती निमित्त पुसद येथील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद चंद्र पवार पक्षाने काकडदाती स्थित असलेल्या वसंत उद्यान मध्ये नाईक साहेबांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून व पूर्णाकृती पुतळ्याला पुष्पार्पण करून विन्रम अभिवादन केले, व त्यानंतर सर्व पधाधिकाऱ्यानी मागील आठ वर्ष्यापासून लोकार्पणाच्या प्रतीक्षेत असलेल्या नाईक साहेबांच्या स्मारकाची पाहणी केलं.

स्मारकाची संपूर्णपणे दुरावस्था झालेली व स्मारकाला इजा पोहचवल्याचे तसेच खिडकी व इतर ठिकाणचे काच फोडण्यात आलेले व इमारतीतील काही माल लंपास झाल्याचे निदर्शनात आले .

यावर बोलताना प्रदेश सरचिटणीस शरद मैंद म्हणाले कि, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री हरित क्रांतीचे प्रणेते स्व. वसंतराव नाईक यांच्या स्मृती जिवंत राहाव्या यासाठी शासनाने 100कोटीं रुपयाचा निधी त्यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्य दिला होता. त्यापैकी 10 कोटी रुपयाचा निधी हा त्यांच्या पुसद तालुक्यातील गहुली या जन्मगावाला दिला,स्व. वसंतराव नाईक यांच्या आठवणी जिवंत राहाव्यात नाईक साहेबांच्या कार्यातून युवकांनी व शेतकऱ्यांनी प्रेरणा घ्यावी यासाठी आठ कोटी रुपये खर्च करून संग्रहालंयाची उभारणी करण्यात आली. आज याला आठ वर्ष झाले असून अजूनही हे वसंत स्मारक आणि संग्रहालय लोकार्पनाच्या प्रतीक्षेत असून या वास्तूचे लोकार्पण लवकरात लवकर करून सर्वसामान्य नागरिकांसाठी मोकळे करून द्यावे अशी मागणी त्यांनी केली.
एक दशकाचा कालावधी लोटूनही जनतेसाठी हे स्मारक खुले करण्यात आलेले नाही. ह्या स्मारकांची दुर्दशा झाली आहे स्मारक परिसरात घाणीचे साम्राज्य, व वाळवंटाचे रूप आले आहे, इमारतीला इजा पोहचली असून खिडकीचे व इतर ठिकाणचे काचे फोडल्या गेली आहेत त्याबद्दल चिंता व्यक्त करण्यात आली.

या प्रसंगी ऍड.अनिल ठाकूर, अनुकूल चव्हाण, ऍड भारत जाधव, दीपक जाधव, नाना जळगांवकर, परमेश्वर जैस्वाल,नाना बेले. यु. एन. वानखेडे, के. जी, चव्हाण,स्वप्नील जैस्वाल, यशवंतराव चौधरी, पंडितराव देशमुख, एकनाथ पूलाते, दीपक अवचार,गणेश दिंडे,आकाश दिंडे, सय्यद नायब भाऊ,अनिल रंगारी, दीपक तायवाडे,उत्तम चापके, दीपक अवचार, प्रवीण कदम, ऍड शेख जुनेद,अभिमन्यू शिंदे,विष्णू गुड्डारवर, सतीश जाधव, दिनेश बलखंडे, दत्ता शिंदे,गौरव शिंदे, करण पैठणकर, अक्षय तावडे, ऍड गोपाल मस्के,प्रथमेश रोडेकर, चक्रधर मुळे, कैलास जळगांवकर, प्रल्हाद भालेराव,यश काळे, संदेश रणवीर, धीरज कांबळे, सुमित पाईकराव, सचिन सांगडे, आशिष पाईकराव,जय दळवी,पवन चव्हाण, ओम आभाळे,रहेमान शेख आवेश, सागर चव्हाण, अजित लोंढे,श्रीकांत वानखेडे व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार चे तालुका व युवक राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार, शहर व युवक राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पुसद तालुका एस टी सेल राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार. सोसिअल मीडिया पुसद तालुका व पुसद शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार सामाजिक न्याय विभाग पुसद तालुका व शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार चे पदाधिकारी व असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.
#युवासंघर्ष-डिजिटल मीडिया


