मुख्य संपादक :-कुलदिप सुरोशे
पुसद. शहरात व तालुक्यात गुन्हेगारी वाढतच चालली आहे. शहरात व तालुक्यात हत्या, हाफ मर्डर, चाकूहल्ले यां घटनाचे प्रमाण वाढतच जातं आहे. यामुळे शहरातील गुन्हेगारी कमी करण्याचे फार मोठे आव्हान पोलिसांपुढे उभे राहिले आहे.

आता पुन्हा एक हत्येची घटना पुसद शहरातील वसंत नगर येथे घडली आहे. पतीने घरगुती वादाच्या कारणावरून आपल्या पत्नीची गळा चिरून हत्या केल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे. यात पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार पुसद शहरातील वसंत नगर येथील टिपू सुलतान चौकातील रहिवासी असनाऱ्या एका पतीने आपल्या पत्नीची दिनांक 7 जुलै 2025 रोजीच्या मध्यरात्री 1 ते 2 वाजताचे दरम्यान घरगुती वादाच्या कारणावरून गळा चिरून हत्या केली.

मोहंमद आसिफ शफी कुरेशी वय अं. 28 वर्षे असे आरोपी पतीचे नाव आहे तर सानिया मोहंमद आसिफ कुरेशी वय अं. 20 वर्षे असे मयत झालेल्या पत्नीचे नाव आहे. दोघात घरकुती कारणावरून वाद झाला व रागाच्या भरात आरोपी पतीने आपल्या पत्नीची गळा चिरून हत्या केली.

सदर घटनेची माहिती वसंत नगर पोलिसांना देण्यात आली पोलिसांनी तात्काळ घटनास्थळ गाठून मृतदेह शवविच्छेदनाकरिता उपजिल्हा रुग्णालय पुसद येथे पाठविण्यात आले. यां घटणेबाबत पोलीस स्टेशन वसंत नगर पुसद येथे फिर्याद दाखल करणे सुरु आहे.
#युवासंघर्ष -डिजिटल मीडिया


