मुख्य संपादक :-कुलदिप सुरोशे
पुसद.तालुक्यातील शेंबाळपिंपरी येथील भारत फायनांन्शियल ईक्लूजन लिमिटेड कंपनीच्या मॅनेजर आणि शाखा व्यवस्थापकाने चक्क लोकांनी कर्जाचे भरलेले सोळा लाख तीस हजार ३३४ रुपये लांबविले. हा प्रकार गेल्या वर्षात दोघांनी संगनमत करून केला. या प्रकरणी संदीप माधवराव टिपरेसवार यांनी दिलेल्या तक्रारीवरून खंडाळा पोलिसांनी व्यवस्थापक ज्ञानेश्वर चक्रधर भोयर, रा. देवठाणा, हिंगोली, प्रदीप पांडुरंग कोरडे (वय ३२, रा. हिप्परगा, नांदेड) या दोघांविरोधात गुन्हे नोंद केले. याबाबत प्राप्त माहितीनुसार पुसद तालुक्यातील शेंबाळपिंपरी येथे भारत फायनांन्शीयल ईक्लूजन लिमिटेड कंपनी आहे. या कंपनीत व्यवस्थापक म्हणून ज्ञानेश्वर भोयर आणि शाखा व्यवस्थापक पदावर प्रदीप कोरडे कार्यरत होते. या शाखेतून परिसरातील नागरिकांना लाखो रुपये फायनान्स स्वरूपात कर्ज देण्यात आले आहे. तर कर्ज घेतलेले नागरिक नियमितपणे शाखेत येऊन पैशाचा भरणा करीत होते. मात्र, मॅनेजर आणि शाखा व्यवस्थापक या दोघांनी संगनमत करून स्वतःच्या फायद्यासाठी नागरिकांनी भरलेले पैस लंपास केले. हा गंडा सप्टेंबर २०२३ ते जून २०२४ या कालावधीत घालण्यात आला. फसवणूक झाल्याचे उघडकीस येताच दोघांनाही पैसे भरण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. मात्र, मॅनेजर आणि शाखा व्यवस्थापकाने पैशाचा भरणा केलाच नाही. शेवटी बुधवारी नांदेड जिल्ह्यातील गोरठा येथील संदीप टिपरेसवार यांनी खंडाळा पोलिस ठाणे गाठून फायनान्स कंपनीची १६ लाख ३० हजार ३३४ रुपयांची फसवणूक केल्याची तक्रार तक्रार दिली. या तक्रारीवरून खंडाळा पोलिसांनी फायनान्स कंपनीचे मॅनेजर ज्ञानेश्वर चक्रधर भोयर (रा. देवठाणा) आणि शाखा व्यवस्थापक प्रदीप पांडुरंग कोरडे (वय ३२, रा. हिप्परगा, नांदेड) या दोघांविरोधात फसवणुकीचा गुन्हा नोंद केला आहे.सदर गुन्ह्यातील निष्पन्न फरार आरोपी ज्ञानेश्वर चक्रधर भोयर वय 25 वर्ष रा. देवठाणा ता. जि. हिंगोली हा मारवाडी फाटा परिसरात ता पुसद येथे थांबलेला आहे अशी गोपनीय माहिती स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ यांना मिळाल्याने सदर ठिकाणी जाऊन त्यास ताब्यात घेऊन पुढील तपास कामे पो स्टे खंडाळा यांच्या ताब्यात दिले.सदरची कारवाई मा. कुमार चिंता, पोलीस अधीक्षक, यवतमाळमा. पियुष जगताप, अपर पोलीस अधीक्षक, यवतमाळ मा. हर्षवर्धन बी. जे. उपविभागीय पोलीस अधिकारी पुसद.मा. सतीश चवरे, पोलीस निरीक्षक, स्थानीक गुन्हे शाखा,यवतमाळ यांचे मार्गदर्शनात करण्यात आली.
#युवासंघर्ष-डिजिटल मीडिया


