मुख्य संपादक:-कुलदिप सुरोशे
पुसद.पेरणीचे समान घेण्यासाठी दुचाकीने पुसद कडे येणाऱ्या शेतकऱ्याचा वाटेतच दुचाकीच्या अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला असल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.

या घटने प्रकरणी समोरच्या दुचाकी चालका विरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्राथमिक माहिती अशी की , प्रकाश बालू जाधव वय 50 वर्ष व त्यांची पत्नी नामे विमल प्रकाश जाधव वय 45 वर्ष दोघे रा. पारवा ता. पुसद जि. यवतमाळ हे आपली दुचाकी होंडा लिवो दुचाकी वाहन क्रमांक MH-29-BW-3832 ने पारवा वरून पुसद कडे पेरणी चे सामान घेण्यासाठी निघाले असता , पुसद मार्गे पारवा कडे जाणाऱ्या हिरो स्प्लेंडर दुचाकी वाहन क्रमांक MH-29-BH-7834 च्या दुचाकीचा पारवा फाटा जवळून एक किलोमीटर पुसद मार्गे असलेल्या ठिकाणावर दोन्ही दुचाकीचा समोरासमोर भीषण अपघात झाला.

या अपघातात होंडा लिओ दुचाकी वरील प्रकाश बाळू जाधव यांचे डोक्याला मागच्या बाजूने व छातीला गंभीर मार लागला यावेळी त्यांचे नाकातोंडातून रक्त निघाले.त्यांचे बरोबर असलेल्या त्यांच्या पत्नी विमल प्रकाश जाधव यांना सुद्धा गंभीर मार लागला.
अपघा हा 19 जून 2025 रोजी च्या सकाळी अंदाजे साडेदहा वाजता च्या सुमारास घडला. प्रकाश जाधव यांना गंभीर मार लागला असल्यामुळे ते रस्त्यावर तडफडत होते. यावेळी ज्या दुचाकी बरोबर अपघात झाला MH-29-BH-7834 च्या चालकाने दुचाकी तेथेच सोडून घटनास्थळावरून पसार केला. अपघात घडताच तेथील उपस्थित लोकांनी , जखमी प्रकाश आणि विमल यांना पुसद येथील एका खाजगी रुग्णालयामध्ये भरती केले. परंतु प्रकाश जाधव यांची प्रकृती गंभीर असल्यामुळे त्यांना थेट नांदेड येथे रेफर केले.त्याच दिवशी दुपारी अंदाजे तीन वाजताच्या सुमारास उपचारादरम्यान गंभीर जखमी असलेल्या प्रकाश जाधव यांचा नांदेड येथील हॉस्पिटलमध्ये दुर्दैवी मृत्यू झाला.

सद्यस्थितीत मृतक प्रकाश जाधव यांची पत्नी विमल प्रकाश जाधव यांचेवर उपचार सुरू आहे. मृतक प्रकाश जाधव यांचा मुलगा अनिकेत प्रकाश जाधव व 24 वर्ष रा.पारवा त्याने ग्रामीण पोलीस स्टेशन पुसद येथे दिलेल्या फिर्यादीवरून दुचाकी वाहन क्रमांक MH 29 BH 7834 च्या चालका विरुद्ध अपराध क्रमांक ३८७/२५ कलम 281 , 125(ब) , 106(1) भारतीय न्यायसंहिता अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
अपघातातील दोन्ही वाहन पोलीस स्टेशन ग्रामीण द्वारे जप्त करण्यात आलेले आहे.महत्वाचे म्हणजे ज्या दुचाकी चालकाविरुद्ध गुन्हे दाखल झाले ते दुचाकी वाहन व चालक सांडवा येथील असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे.सदर घटनेचा प्राथमिक तपास बीट जमादार संदीप राठोड व मदतनीस पोलीस अंमलदार निलेश भालेराव यांनी केला असून, उर्वरित तपास पोलीस स्टेशन ग्रामीण ठाणेदार राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली बीट जमादार संदीप राठोड हे करीत आहे.


