मुख्य संपादक :-कुलदिप सुरोशे
पुसद: दि. 06/07/25 रोजी पोलिस स्टेशन पुसद शहर चे ठाणेदार सेवानंद वानखेडे हे त्यांच्या पोलिस स्टाफ पो. हे.कॉ संतोष आढाव, पो. हे. कॉ अभिमन्यू चव्हाण, पो. हे. कॉ मंदाकिनी भगत , पो. हे. कॉ मनोज कदम, पो. ना.दिनेश सोळंके, पो. कॉ.आकाश बाभूळकर यांच्या सह आषाढी एकादशी निमित्ताने शहरात पेट्रोलिंग करीत असताना अंदाजे सकाळी 8.30 वाजताच्या सुमारास त्यांना गोपनीय माहिती मिळाली की एक इसम हा त्यांच्या ऑटो क्रमांक MH -26-TC- 0416 चालक सय्यद सालार सय्यद रज्जाक वय 53 वर्ष राहणार गढी वॉर्ड पुसद हा त्यांच्या ऑटो मध्ये शासनाने प्रतिबंधित केलेले गोमांस वाहतूक करून घेऊन जाणार असल्याचे कळतच सदर ऑटो व चालकास ऑटोच्या मधल्या सीटच्या गाळ्यात नायलॉन पोत्याच्या फारी मध्ये गुंडाळुन मास झाकून ठेऊन वाहतूक करतांना पकडले.
सदरचे गोमांस मोहम्मद अतिक मोहम्मद अकिल कुरेशी वय 30 वर्ष राहणार उर्दू स्कूल नेहरून वॉर्ड पुसद यांच्या सांगण्यावरून लोहार लाइन पुसद येथे घेऊन जात असल्याचे ऑटोचालकाने पंचसमक्ष सांगितले . मुदेमालासह आरोपीस ताब्यात घेऊन पो. स्टे.पुसद शहर येथे आणले व श्री डॉ सुशील चव्हाण साहेब (पशुधन विकास अधिकारी) तालुका लघु पशुवैद्यकीय सर्व चिकित्सालय पुसद यांनी मासांची तपासणी केली असता सदर मास गोवंशाचे असल्याचे प्रथमदर्शनी सांगितले व सदर मासाचे सॅमपल घेण्यात आले आहे.
आरोपी जवळ असलेला बजाज कंपनीचा ऑटो असून त्याची किंमत अंदाजे.1,50,000 /_रुपये ऑटो मधील गोमास वजन अंदाजे 120 की ग्रॅम किंमत अंदाजे 24,000 रुपये एक इलेक्ट्रॉनिक वजन काटा किंमत अंदाजे 1,500 रुपये एक लोखंडी सुरा व ऑटोचालक याचा मोबाईल किंमत अंदाजे 7,000 रुपये असा एकूण ,1,82,500/रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.आरोपी विरुद्ध अप. क.416/2025,कलम-5, 5(क),9, 9 (अ)महाराष्ट्र प्राणी रक्षण अधिनियम 1976 नुसार गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
सदर ची कार्यवाही मा. पोलिस अधीक्षक श्री कुमार चिंता , मा अप्पर पोलीस अधीक्षक पीयुष जगताप मा. श्री.हनुमंत गायकवाड , उप विभागीय पोलीस अधिकारी पुसद यांच्या मार्गदर्शनाखाली पुसद शहर पोलीस स्टेशन चे पोलीस निरीक्षक श्री.सेवानंद वानखेडे यांच्या नेतृत्वात त्यांच्या पोलिस पथकाने केली असून गुन्ह्याचा पुढील तपास सा. पो.निरीक्षक प्रेमकुमार केदार करीत आहेत.
#युवासंघर्ष-डिजिटल मीडिया


