मुख्य संपादक :-कुलदिप सुरोशे
पुसद. तालुक्यातील तहसील कार्यालय हे नेहमीच कोणत्या ना कोणत्या बाबीवरून चर्चेत असतेच, पुसद तहसील कार्यालयात भ्रष्टाचार करणे हे नित्याचेच झाले आहे,या कार्यालयात काही काळाआधी नागरिकांच्या जन्ममृत्यू नोंद करण्यासाठी कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी पैसे घेतल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला होता. यावरून सदर कर्मचाऱ्याला कामावरून कमी करण्यात आले होते तसेच आता परत एकदा तहसील कार्यालयात अन्नपुरवठा विभागातील धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार तहसील कार्यालयात अन्नपुरवठा विभागात नागरिकांना त्यांच्या राशन कार्ड मध्ये दुरुस्ती करणे, नवीन राशन कार्ड बनवून त्याला ऑनलाईन करणे याकरिता शासनाकडून नियम अटी घालून दिल्या आहेत, व राशन कार्ड ऑनलाइन करण्याकरिता कालमर्यादा सुद्धा निश्चित करण्यात आली आहे परंतु पुसद तहसील कार्यालयातील पुरवठा विभागाचा मनमानी कारभार सुरू आहे. तेथील कर्मचारी हे नागरिकांचे राशन कार्ड ऑनलाइन करण्यासाठी सहा महिने किंवा एक वर्ष दोन वर्षे असा कालावधी लावत आहेत परंतु एखाद्या नागरिकांनी त्या कर्मचाऱ्याला काही चिरीमिरी दिल्यास त्याचे राशन कार्ड त्वरित आठच दिवसात ऑनलाईन करण्यात येत आहे, ही अत्यंत गंभीर बाब आहे. सदर प्रकार हा तहसीलदार जोरवर यांच्या नाकावर टिचून सुरू असताना सुद्धा याकडे त्यांनी जाणीवपूर्वक दुर्लक्ष केल्याचे चित्र दिसत आहे. तसेच याबाबत नागरिकांनी तहसीलदारांकडे तोंडी तक्रारी केल्यास त्यावर कोणतीही कारवाई होत नसून उलट नागरिकांना सदरचा विभाग बंद करण्याची आणि नागरिकांना नाहक त्रास देण्याची भाषा बोलली जात आहे. या गंभीर बाबीकडे वरिष्ठ अधिकारी यांनी गांभीर्याने लक्ष देणे गरजेचे आहे.
साहेब एसी रूम च्या बाहेर या हो…!
सदर प्रकार हा तहसीलदार यांच्या नाकावर टिचून सुरु असताना सुद्धा तहसीलदार जोरवर मात्र एसीच्या रूममध्ये बसून कारभार पाहत आहेत.त्यांनी हा प्रकारा एसी रूमच्या बाहेर येऊन बघावे अशी नागरिकांनमध्ये चर्चा सुरु झाली आहे.
#युवासंघर्ष-डिजिटल मीडिया


