क्रांतिकारी समाजसुधारक महात्मा जोतिराव फुले यांच्या स्मृती दिनानिमित्त सिरोंचा पत्रकार संघटना तर्फे आज आदरांजली कार्यक्रम आयोजित करण्यात आला.
फुले यांनी समाजातील अन्याय, अंधश्रद्धा, जातिभेद निर्मूलन व शिक्षण प्रसारासाठी केलेल्या योगदानाचे स्मरण करून उपस्थित पत्रकारांनी त्यांना अभिवादन केले.
आणि बैठकही पार पडली आहे
कार्यक्रमात संघटनेचे पदाधिकारी, सदस्य आणि स्थानिक पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थितांनी फुले यांच्या कार्याचा आदर्श ठेवत समाजजागृतीसाठी पत्रकार म्हणून योगदान देण्याचा संकल्प व्यक्त केला.यावेळी, स्टार महाराष्ट्र न्युज तथा दै. सुवर्ण महाराष्ट्र चे जिल्हा प्रतिनिधी श्याम भाऊ बेज्जनवार, पब्लिक समाचार मुख्य संपादक, सागर मुलकाला, व चंद्पूर समाचार चे तालुका प्रतिनिधी अशोक कुम्मरी, 1 टीव्ही न्यूज जिल्हा प्रतिनिधी मुरलीधर मारगोणी, तरुण भारत प्रतिनिधी सत्यम गोरा संघटनेचे सदस्य उपस्थित होते.






