सिरोंचा, दि. 16 डिसेंबर: राष्ट्रीय पत्रकार दिवसा निमित्ताने सिरोंचा तालुका पत्रकार संघटनेचा वतीने सिरोंचा मुख्यालय येथे शासकीय विश्राम गृह येथे बैठक पार पडली आहे,या बैठकीत पत्रकारांची विविध समस्येबाबत चर्चा करण्यात आली, तसेच तालुका पत्रकार संघाचे प्रिंट, पोर्टल, युट्यूब, डिजिटल पेपर यांची नवीन कार्यकारिणी जाहीर करण्यात आली आहे, या मध्ये सागर मुलकला यांची अध्यक्ष म्हणून, तर मुरली मारगोणी यांची उपाध्यक्ष म्हणून तसेच अशोक कुम्मरी यांची सचिव म्हणून निवड करण्यात आली आहे. नवीन पदाधिकाऱ्यांच्या निवडीमुळे संघटनेचे काम अधिक प्रभावी, संघटित आणि गतिमान होण्याची अपेक्षा पत्रकारांनी व्यक्त केली जात आहे. याप्रसंगी पत्रकार बांधवांनी एकमेकांचे अभिनंदन करून भविष्यात एकत्रितपणे कार्य करण्याचा संकल्प व्यक्त केली आहे, त्यावेळी जेष्ठ पत्रकार तसेच मार्गदर्शक नागभूषनाम चाकीनारापू काका व रामचंद्रम कूम्मरी काका, तसेच सल्लागार रवी सल्लम, सुरेश तीपट्टीवार,रवी बारसागडी, साईनाथ दुर्गम, देवेंद्र रंगुवार, महेश आगुला, वेंकटस्वामी चाकीनाला, सत्यम गोरा, छोटू खान,रवी येमुर्ला, सुधाकर सिडाम, श्याम बेज्जानीवार, संतोष गोलेट्टीवार यांची उपस्थिती होते,







