सिरोंचा नगर पंचायत सिरोंचा हद्दीतील वार्ड क्रमांक 10 मधील मदनक्का गट्टू चिंताला यांना लकवा मारल्याने मदनक्काला पुढील उपचारासाठी आर्थिक मदत लागत असल्याची माहिती मिळताच सिरोंचा येथील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पदाधिकाऱ्यांनी अहेरी विधानसभा क्षेत्राचे लोकप्रिय आमदार डॉ. धर्मराव बाबा आत्राम यांना माहिती देताच वेळेचा विलंब न करता सामाजिक बांधलीकी जपत, पुढाकार घेत लकवाग्रस्त रुग्णाला आर्थिक मदत केली
अहेरी विधानसभा क्षेत्राचे *आमदार तथा माजी कॅबिनेट मंत्री डॉ. धर्मराव बाबा आत्राम* यांच्या नेतृत्वाखाली *सिनेट सदस्य तनुश्री ताई आत्राम* यांच्या हस्ते लकवाग्रस्त रुग्णाला आर्थिक मदत देण्यात आली.
यावेळी सिनेट सदस्य तनुश्री ताई आत्राम,राष्ट्रवादी काँग्रेस तालुका अध्यक्ष मधुकर कोल्लूरी, नगरसेवक सतीश भाऊ भोगे, राष्ट्रवादी काँग्रेसचे बानय्या जनगाम, सिरोंचा शहर अध्यक्ष रवी सुलतान,दुर्गेश लंबाडी,सरपंच लक्ष्मण गावडे, रमेश पोट्टाला,रमेश मानेम,राष्ट्रवादी काँग्रेस शोशल मीडिया प्रतिनिधी तिरुपती चिट्याला, गणेश राच्चावारसह सिरोंचा शहरातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.







