भाग्यश्री ताई आत्राम यांच्या हस्ते पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन**
श्याम बेज्जनवार
गडचिरोली
आदिवासी समाजाचे शौर्य, संघर्ष आणि स्वाभिमानाचे प्रतीक असलेल्या थोर स्वातंत्र्यसेनानी भगवान बिरसा मुंडा यांच्या जयंतीनिमित्त सिरोंचा येथे आदरांजलीचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला आहे,
या प्रसंगी जिल्हा परिषद माजी अध्यक्षा व विद्यमान सदस्य, गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली माननीय भाग्यश्री ताई आत्राम माजी नगरसेवक रवी रालाबंडीवार, नगरसेवक रंजीत गागापूरवार,माजी नगरपंचायत अध्यक्ष राजू पेदापल्ली MD शानू, सलाम भाई सत्तार,मयूर पूप्पाला, संदीप गागापुरपू ,सुजल कमलवार ,तसेच गोंडवाना गोटुल समिती सिरोंचा गोटुल समिती अध्यक्ष श्री.मधुकर मडावी, शंकर चिंतूर, निमय्या आत्राम , रमेश आलम,सुधाकर, भगवान कोडापे सर , निलेश वेलादी, नरेश पोरतेट, आदी मान्यवरांनी बिरसा मुंडा यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
कार्यक्रमात बिरसा मुंडा यांच्या महान कार्याची, आदिवासी समाजासाठी केलेल्या संघर्षाची आणि त्यांच्या आदर्शांची उजळणी करण्यात आली. उपस्थित मान्यवरांनी त्यांच्या विचारांचे स्मरण ठेवून समाजातील ऐक्य, शिक्षण आणि जागृतीची आवश्यकता अधोरेखित केली.
स्थानिक नागरिक, सामाजिक कार्यकर्ते आणि युवक मोठ्या संख्येने उपस्थित राहिले. कार्यक्रम शांततामय आणि भावनिक वातावरणात संपन्न झाला आहे.







