साजरा* आज दि २६ नोव्हेंबर २०२५ रोज बुधवार ला भगवंतराव हायस्कूल कोत्तागुडम, सिरोंचा येथे संविधान दिनाच्या प्रसंगी शाळेत कार्यक्रम साजरा करण्यात आला. या प्रसंगी *संविधान शपथ* घेण्यात आली. याचबोराबर संविधानाचे महत्व विद्यार्थ्यांना सांगण्या आले. तसेच २६ नोव्हेंबर २००८ ला मुबंईत झालेल्या दहशतवादी हल्ल्यात शहीद जवानांना श्रद्धांजली देण्यात आली. या प्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक के. बी. जवाजी सर यांनी संविधान निर्मिती कशी, कधी करण्यात आली व भारतात अमलात कधी आणण्यात आले. याविषयी संपूर्ण माहिती दिली. तसेच संविधानाचे महत्व सुध्दा विद्यार्थ्यांना पटवून दिले. कार्यक्रमाच्या निमित्ताने डॉ बाबासाहेब आंबेडकर ह्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण त्यांची वंदना करण्यात आली. ह्यावेळी शाळेतील सहाय्यक शिक्षक व्ही. एस. बेझलवार, सहाय्यक शिक्षिका एस. डी. वैरागडवार, शिक्षक राजेश दिकोंडा, तसेच शिक्षकेत्तर कर्मचारी सुरेश धोबे, श्रीनिवास पेंडालवार, एस आय शेख व विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते.







