*मोयाबीनपेठा येथील प्राथमिक आरोग्य उपकेंद्रही अंधारात…!* *सिरोंचा*….. तालुक्यातील रेगुंठा क्षेत्रातील मोयाबीनपेठा या गावातील श्री.गग्गूरी बापू यांचे घराजवळील विद्युत जनित्र मागील शुक्रवारी जळाल्याने आठवडाभरा पासून अर्धा गावासह येथील प्राथमिक आरोग्य उपकेंद्र सुद्धा अंधारात असल्याची धक्कादायक माहिती हाती आली आहे. विशेषत:याबद्दल संबंधित विभागाला अनेक तक्रारी केल्यानंतर सुद्धा नवीन जनित्र अद्याप न बसवल्याची विश्वासनीय सूत्राकडून माहिती मिळाली आहे. याकडे संबंधित विभागाने दुर्लक्ष केल्याने मागील आठवडाभरा पासून येथील नागरिकांसह रुग्णांना सुद्धा फटका बसत आहे. संबंधित विभागाने तात्काळ लक्ष घालून मोयाबीनपेठा येथे नवीन विद्युत जणीत्र लावून येथील विद्युत समस्या तात्काळ सोडविण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.







